Car and Ambulance Carrying Patient Crash,Patient Dead

Posted On April 18, 2017 By In Top Stories


राज्यात अपघातांचं सत्र अद्यापही सुरूच
उस्कई पोंबुर्फा इथं घडला अपघात
१०८ रुग्णवाहिका आणि ओमणी यांच्यात धडक
रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला दिली धडक
कारचालक आग्नेल रॉड्रीग्स गंभीर जखमी
रुग्णवाहिकेतील रुग्ण सुदैवाने बचावला

एका बाजूनं अपघातांची मालिका बंद करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न चालू असताना अपघातांची मालिका मात्र चालूच आहे. मंगळवारी चक्क एका १०८ रुग्णवाहिकेला समोरून येणाऱ्या ओमणी कारनं धडक दिली. या रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. त्यांना काहीही दुखापत झाली नाही; मात्र ओमणी कारचालक गंभीर जखमी झाला. जखमी चालकाच नाव आग्नेल रॉड्रीग्स असं आहे. त्याचा पाय गाडीत अडकून पडल्यानं अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन त्याला बाहेर काढलं अन तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी येऊन घटनेचा पंचनामा केला.

223
SHARES

Tags :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close