गोवा विद्यापीठात ‘डिजिटल इंडिया’ कार्यशाळा सुरू
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते उद्घाटन
४० महाविद्यालयांना मोफत वायफाय सुविधा देणार
चिंबलच्या आयटी हबला लवकरच मिळणार चालना
चिंबलातील आयटी हबसाठी गोव्याचा तेलंगणाशी करार
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘डिजिटल इंडिया’ कार्यक्रम गोव्यातही सुरू करण्यात आला असून मंगळवारी गोवा विद्यापीठात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. गोवा विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाच्या सभागृहात हा उद्घाटनसोहळा पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत ‘डिजिटल इंडिया कार्यशाळा घेण्यात येताहे. या कार्यशाळेत गोव्यातील विविध महाविद्यालयातील सुमारे तीनशे विद्यार्थी सहभागी झालेत.
यावेळी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. गोव्यातील विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानात मागे पडू नयेत, यासाठी ४० महाविद्यालयांमध्ये मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याची घोषणा यावेळी पार्सेकर यांनी केली. यासाठी गोवा सरकारनं तेलंगणाशी करार केल्याचं पार्सेकर यांनी यावेळी सांगितलं.