55 YEAR OLD MURDERED IN HOTEL IN PANAJI

Posted On June 20, 2016 By In Crime, Local, Top Stories


‘सपना’ हॉटेल पंचावन्न वर्षाच्या इसमाचा निर्घृण खून
हॉटेलमालकाच्या बेजबाबदारपणामूळ झाला दुसऱ्यांदा खून
मयतासोबतचे तीन तरुण खून करून झाले पसार
हॉटेलच्या नोंदणीवहीत केवळ एकाचेच नाव
हॉटेलमालकाच्या बेजबाबदारपणामुळे तपासात अडथळे
चार पर्यटक आले होते कॅसिनोत खेळण्यासाठी
चौघांकडे मोठी रक्कम असण्याची शक्यता

पणजीतल्या पाटो-प्लाझा भागातील ‘सपना’ हॉटेलमध्ये सोमवारी ५५ वर्षांच्या पर्यटकाचा खून झाल्यानं खळबळ माजलीये. या पर्यटकासोबत असलेले अन्य तीन तरुण या घटनेनंतर पसार झालेत. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासकाम चालू केलं असता, संपूर्ण घटनेत हॉटेलमालक अत्यंत बेजबाबदार असल्याचं ‘इन गोवा’च्या करड्या नजरेत कैद झालंय. काय आहे हा संपूर्ण प्रकार पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट…

पणजीतल्या पाटो-प्लाझा भागातील ‘सपना’ हॉटेलमध्ये सोमवारी ५५ वर्षांच्या पर्यटकाचा खून झाल्यानं खळबळ माजलीये. हा पर्यटक तीन सहकार्यांसह रविवारी हॉटेलमध्ये उतरला होता. यातील खून झालेल्या पर्यटकाचीच हॉटेलच्या नोंदवहीत नोंद करून त्याच्या ओळपत्राची नमुनाप्रत घेण्यात आलीया. या चौघांना दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०९ देण्यात आली होती. हे पर्यटक दिवसभर हॉटेलमध्ये राहिले. रात्री ही चौकडी कॅसिनोत गेली. त्यानंतर ही चौकडी उशिरा हॉटेलवर आली. सकाळी हॉटेलचा वेटर चहा घेऊन खोलीकडे गेला आणि त्यानं खोलीचं दार ठोठावलं; मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खूप वेळ दार ठोठावल्यानंतर त्यानं मालकाला सांगितलं. मालकानं येऊनही दार ठोठावलं, तरी आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं काहीतरी अघटीत घडल्याचा संशय हॉटेलमालकाला आला. त्यानं लगेच पणजी पोलिसांना वर्दी दिली. पणजीचे पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता खोलीमध्ये ५५ वर्षाच्या इसमाचा मृतदेह बेडवर पडलेला दिसून आला. या इसमाचे तोंड बांधलेलं होतं. त्याच्यासोबतचे तीन तरुण पसार झाले होते.

दरम्यान, पोलिसांनी श्वानपथकाच्या साहाय्यानं खुन्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलची नोंदवही पाहिली असता, हॉटेलमालकाचा बेजबाबदारपणा समोर आला. नोंदवहीत चौघांपैकी दोघांचं नावं नोंदवण्यात आलंय. तेही ज्याचा खून झाला, त्याचीच नोंद करण्यात आलीये. तसंच त्याच्या ओळखपत्राची नमुनाप्रत घेण्यात आलीये. ती नमुनाप्रतही नीट दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता… या ओळखपत्रावर त्या व्यक्तीचं नाव वीरेंद्रकुमार कौशिक असं असून नोंद वहीत याच नावापुढे मोसिन खान अशा नावाची नोंद झालीये. आता हे ओळखपत्र खरं आहे का खोटं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवाय नोंदवही दाखवताना मोसिन खान याचं नाव हॉटेलमालक बोट ठेवून लपवत होत. आता ही लपवाछपवी का? हे अद्याप उघड झालेलं नाही. हे नाव खुद्द हॉटेलमालक लपवत होता. लपवाछपवीचा हा प्रकार इन गोवाच्या कॅमेरात कैद झालाय. तुम्ही बघू शकता, हॉटेलमालक दुसरे नाव कसं लपवत आहे, ते.
दरम्यान, या हॉटेलमध्ये सीसीटीव्हीदेखील नीट लावलेले नसल्याचं उघड झालं. म्हणजे गुन्हेगारांसाठी हॉटेलमध्ये रानं मोकळचं ठेवण्यात आल्याचं स्पष्ट झालंय.

दरम्यान, या हॉटेलमध्ये दोन वर्षांपूर्वी एका पर्यटक महिलेचा निर्घृण खून झाला होता. त्यावेळेसही नोंदवहीत नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळं तो खुनी अजूनही मोकाट आहे. तेव्हा पोलिसांनी हॉटेलमालक भाऊ चोपडेकर याला सुरक्षेच्या दृष्टीनं कडक सूचना दिल्या होत्या, मात्र त्यावर कसलीच कार्यवाही चोपडेकर यानं केली नाही, परिणामी सोमवारी दुसरा खून झाला. हॉटेलमालकाच्या चुकीमुळं पोलिसांचे तपासकाम अवघड झालंय. हॉटेलमालक चोपडेकर हा भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे. शिवाय त्यानं पणजी महापालिकेचं नगरसेवकपदही भूषवलंय. त्यामुळं त्याच्या या बेजबाबदार वृत्तीवर भाजप सरकार तथा पोलीस काय कारवाई करतात, याकडे पणजीकरांच्या नजरा लागून राहिल्याहेत.

266
SHARES

Tags : , ,

1 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close