600 Year Old Bhui-Kot Castle Destroyed By Water Resource Department

Posted On April 14, 2017 By In Special Stories, Top Stories


 

फोंड्यातील प्राचीन भुईकोट किल्ल्याचा बुरुज पडला
सहाशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यावर सरकारी आघात
जलस्रोतमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
‘इन गोवा’च्या वृत्ताचा परिणाम
जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली किल्ल्याची पाहणी

फोंड्यातील सहाशे वर्षांपूर्वीची आदिलशहानं बांधलेल्या भूईकोट किल्ल्याचा अत्यंत प्राचीन संरक्षक कठडा जलस्रोत खात्यानं नष्ट केल्याचं उघडकीस आलं असून यावर इतिहासप्रेमींनी जोरदर संताप व्यक्त केलाय. या प्रकरणावर ‘इन गोवा’नं प्रकाश टाकताच २४ तासांच्या आत जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी याची दखल घेतली. मंत्र्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केली.

voice over
भारताचा शिवकालीन इतिहास अभ्यासायचा म्हटलं की गडकिल्ले आलेच. ऐतिहासिक पुरुषांनी गाजवलेल्या कर्तृत्त्वाची साक्ष देणारे हे गडकिल्ले आजही सह्याद्रीच्या डोंगरकडांमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतात. या इतिहासातून नव्या पिढीला स्फूर्ती मिळत राहते. म्हणूनच सरकारतर्फे अशा प्राचीन स्थळांचं जतन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पुरातन विभाग चालवला जातो. पण याच सरकारनं गोव्याला लाभलेल्या दुर्मिळ अशा वारसा स्थळांचा विध्वंस करण्याचं काम सुरू केलंय की काय, असा प्रश्न उपस्थित झालाय. हा प्रकार आहे फोंडा भागातील भुईकोट किल्ल्याचा. सुमारे सहाशे वर्षांपूर्वी म्हणजे पोर्तुगीज येण्यापूर्वी आदिशहाने हा मजबूत किल्ला बांधला होता. विकासकामांच्या नावाखाली या किल्ल्याच्या एका बाजूची संरक्षक भिंत उद्ध्वस्त करण्यात आलीये. हा प्रकार सरकारच्या जलस्रोत खात्यानं केलाय. या प्रकारावर इतिहासप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केलीये. या प्रकरणाचं वृत्त इन गोवानं प्रदर्शित करताचं जलस्रोतमंत्री पालयेकर यांनी त्याची गंभीर दखल घेतली.

290
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close