AAP MEMBERS DEMONSTRATE

Posted On August 10, 2016 By In Local, People, Top Storiesमुख्यमंत्र्यांच्या निलंबित नातेवाईकाला सेवेत घेतल्याचे प्रकरण
‘आम आदमी पक्षा’नं छेडले पणजीत आंदोलन
विधानसभेत आवाज उठवण्यासाठी छेडले आंदोलन
क्रांती सर्कलजवळ आंदोलकांना पोलिसांनी केली अटक
पोलीस-कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की
धक्काबुक्कीत आपचे दोन कार्यकर्ते जखमी
जखमी कार्यकर्ते उपचारासाठी गोमेकॉत दाखल
पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी केला निषेध

लाचप्रकरणी निलंबित झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाला पुन्हा सेवेत घेतल्याच्या निषेधार्थ आम आदमी पक्षानं तीव्र आंदोलन छेडलंय; मात्र या विषयावर विधानसभेत कोणीही आवाज उठवलेला नाही. त्यामुळं संतप्त बनलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी पणजीत आंदोलन छेडलं. यावेळी आंदोलकांनी सचिवालयाच्या दिशेन कूच केली असता पोलिसांनी त्यांना क्रांती सर्कलजवळच अडवून धरलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी खबरदारीचे उपाय म्हणून १४४ कलमाखाली आंदोलकांना अटक करून नंतर त्यांची मुक्तता केली.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळं पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केल्याची माहिती पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकारांना दिली. त्याचबरोबर त्यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध केला.

194
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close