AAP’s Goa CM candidate alleges harassment after being quizzed in land scam case

Posted On December 26, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


गृहनिर्माण मंडळातील कथित भूसंपादन घोटाळा प्रकरण
एसीबीकडून एल्विस गोम्स यांची साडेतीन तास कसून चौकशी
‘आम आदमी’ची एसीबी कार्यालयाबाहेर निदर्शने
राजकीय हेतूने चौकशीचा ससेमिरा : एल्विस

राज्य गृहनिर्माण मंडळाच्या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं सोमवारी तब्बल साडेतीन तास एल्वीस गोम्स यांची कसून चौकशी केली. या चौकशीवेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसीबीच्या कार्यालयाबाहेर जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एल्विस हे ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, हा निव्वळ चौकशीचा फार्स असल्याची प्रतिक्रिया एल्विस यांनी व्यक्त केली.

एसीबीनं सकाळच्या सत्रात एल्विस गोम्स यांची चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी राज्य गृहनिर्माण वसाहत मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष नीळकंठ हळर्णकर यांची चौकशी करण्यात आली.

252
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close