ACID ATTACK: POLICE DETAIN 3 SUSPECTS

Posted On June 8, 2016 By In Crime, Top Stories

Acid attack goa

अॅसिड हल्ल्याचे लोन पोहोचले गोव्यात
घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला?
गिरी-म्हापसा भागात माजली खळबळ?
घराच्या खिडकीतून फेकले तोंडावर अॅसिड?
अॅसिड हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी?
‘तपासात कोणाचीही गय करू नका’
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांचा पोलिसांना आदेश

गिरी-म्हापसा इथं सोळा वर्षाच्या मुलीवर अज्ञात युवकानं अॅसिड हल्ला केल्यानं बुधवारी खळबळ माजली. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय. दरम्यान, पोलिसांनी तपासात कोणाचीच गय करू नये, अशी कडक सूचना पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिलीये.

उत्तर भारतात फोफावलेल्या अॅसिड हल्ल्याचं लोन आता सुशिक्षित गोव्यातही पोहोचलंय. ही बाब बुधवारी सकाळी गिरी-म्हापसा इथं घडलेल्या घटनेवरून समोर आली आणि गोवेकरांची मान शरमेन खाली गेली. सोळा वर्षाच्या मुलीवर अज्ञात युवकानं अॅसिड हल्ला केल्यानं या भागात खळबळ माजली. ही मुलगी घरात झोपलेली असताना युवकानं खिडकीतून तिच्यावर अॅसिड फेकलं आणि तिथून पलायन केलं. या दुर्घटनेत मुलीचा चेहरा पूर्णपणे काळवंडला. तिला लगेच म्हापशाच्या आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, या घटनेला मुलीच्या कुटुंबियांनी शेजाऱ्यांवर बोट ठेवले आहे. पूर्ववैमनस्यातून शेजाऱ्यांनी हे कृत्य केलं असावं, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी संशयावरून सध्या तीन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. वसंत गावस, सनीत देसाई आणि नारायण गावस अशी संशयितांची नावं आहेत.

या दुर्घटनेवर स्थानिक आमदार या नात्यानं पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी अतिशय कडक प्रतिक्रिया दिलीये. गोव्यात असा प्रकार घडणे दुर्दैवी असल्याचं मंत्री परुळेकर यांनी म्हटलंय. या घटनेच्या तपासात पोलिसांनी कोणाचीही गय करू नये, अशी सूचना परुळेकर यांनी दिलीये.

211
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close