भाजपची लोकसभेसाठी पूर्वतयारी सुरू
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्यात दाखल
दाबोळीत शहा यांचे जंगी स्वागत
आझाद मैदानावर जाऊन हुतात्म्यांना केले अभिवादन
भाजप, मगो, गोवा फॉरवर्डच्या नेत्यांसोबत केले भोजन
देशात २०१९ या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं पूर्वतयारी सुरू केलीये. यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहात शनिवारी गोव्यात दाखल झाले. दाबोळी विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रदेश भाजप नेत्यांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीनं जंगी स्वागत केलं. यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात विमानतळाबाहेर उभे होते. याच ठिकाणी उभारलेल्या व्यासपीठावर प्रथम त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
दाबोळी विमानतळावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर शहा पणजीत पोहोचले तिथं त्यांनी आझाद मैदानावर जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं. त्यानंतर सर्किट हाऊसमध्ये त्यांनी भाजप नेत्यांबरोबर सरकारच्या घटकपक्षातील सर्व आमदारांसोबत बसून भोजन केलं. शेवटी त्यांनी सर्व मंत्री आणि आमदारांबरोबर भाजप नेत्यांशी संवाद साधला.