ASSEMBLY SESSION TO BEGIN FROM MONDAY

Posted On July 20, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


पावसाळी अधिवेशन सोमवारपासून
अधिवेशनासाठी आले २,२१२ प्रश्न

येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधानसभेच्या पावसाळी आणि अखेरच्या अधिवेशनासाठी आतापर्यंत २ हजार २१२ प्रश्न आमदारांकडून विचारण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ५५० हे अतारांकित तर ६२२ तारांकित आहेत. प्रश्न सादर करण्याचा बुधवार हा अखेरचा दिवस आहे.
राज्य विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सभापती अनंत शेट यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी कामकाज सल्लागार मंडळाची बैठक झाली. या बैठकीस मुख्यंमत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, उपसभापती विष्णू वाघ, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर आदी उपस्थित होते. अधिवेशनात १३ सरकारी विधेयके संमतीसाठी येणार आहेत. अधिवेशन पंधरा दिवस चालणार असून २५ रोजी त्याची सुरूवात होईल. १२ ऑगस्ट रोजी ते संपुष्टात येईल.

या अधिवेशनात शुक्रवारी खासगी कामकाजाच्या दिवशी देखील सरकारी कामकाज चालणार आहे तसंच सरकारी कामकाजावर चर्चा होणाराहे.

228
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close