AGAIN ATTACK ON TOURIST BUS, THIS TIME AT VEREM

Posted On June 24, 2017 By In Crime, Top Stories


गोव्यातील पर्यटनाला गालबोट!
राज्यात देशी पर्यटकांना मारहाण करण्याच्या घटनांत वाढ
महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटकांवर स्थानिक युवकांचा हल्ला
वेरे – मानशीजवळ पर्यटक – स्थानिकांत पुन्हा जुंपली
मेरशीतील घटनेनंतर वेरेतही पर्यटकांवर हल्ला
चार स्थानिक युवकांनी गाडी आडवून केला हल्ला
दोन पर्यटकांना डोक्यात बाटल्या फोडून केले जखमी
पर्यटकांनी हात प्रतिहल्ल्याची तयारी करताच युवकांनी काढला पळ
प्रकरणाची अद्याप पोलीस तक्रार नाहीच
परराज्यात आल्याने पर्यटकांनी घेतला काढता पाय
देशी पर्यटकांची असुरक्षा आली चव्हाट्यावर
पोलीस स्वेच्छा दखल घेऊन युवकांना वठणीवर आणणार का?

मेरशीत देशी पर्यटकांच्या सशस्त्र बसवर हल्ला होण्याची घटना ताजी असतानाच शनिवारी वेरे मानशी इथं पुन्हा स्थानिक युवकांनी पर्यटक बसवर हल्ला चढवून पर्यटनाला काळीमा फासला. दरम्यान, या प्रकरणाची अद्याप पोलिसांत तक्रार झालेली नसल्यानं युवक मोकाट सुटलेत. या हल्ल्यात दोन पर्यटकांच्या डोक्यात मद्याच्या बाटल्या फोडून जखमी करण्यात आलंय.
गेल्या १४ जून रोजी मेरशी इथं महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटक बसवर सशस्त्र हल्ला करून अनेक पर्यटकांना जखमी करण्याची घटना घडली होती. याच घटनेची पुनरावृत्ती शनिवारी वेरे – मानसी इथं घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेल्या पर्यटक बसवर मद्यपान केलेल्या स्थानिक युवकांनी बस अडवून हल्ला चढवला. वेरे मानसीवर शनिवारी काही युवक मद्यपान करून सांजावची मजा लुटत होते. या ठिकाणी काही पर्यटकदेखील आले होते. यावेळी पार्किंगमधून बस वळवताना दोन स्थानिक युवकांची पर्यटकांशी वाद झाला. हा वाद झाल्यानंतर पर्यटक बस मार्गस्थ होत होती. इतक्यात ते दोन युवक आणि आणखी दोन युवक असे एकूण चार स्थानिक युवकांनी येऊन ही बस आडवली आणि पर्यटकांवर हल्ला चढवला. या बसमध्ये बहुतेक सर्वजण पुरुष मंडळी होती. आपल्या सहकाऱ्यांवर हल्ला होत असल्याचे पाहून बसमधील सर्वजण खाली उतरू लागले. पर्यटकांचं संख्याबळ जास्त असल्याचं पाहून या युवकांनी दोन पर्यटकांच्या डोक्यात मद्याच्या बाटल्या फोडून पलायन केलं. या घटनेत ते पर्यटक जखमी झाले. या पर्यटकांना घेऊन बस रूग्णालयाच्या दिशेनं मार्गस्थ झाली. यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी विजय रेडकर यांनी फोनवरून या सर्व घटनेचा वृत्तांत दिलाय… नक्की काय घडलं ऐकूया विजय रेडकर यांच्याकडून….

या घटनेची अद्याप पोलीस तक्रार दाखल झालेली नाही; मात्र देशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला. अशाप्रकारे पर्यटकांवर हल्ले होऊ लागल्यास गोव्याच्या पर्यटक व्यवसायाला त्याची झळ पोहोचण्याची शक्यता असल्यानं पोलीस स्वेच्छा दखल घेऊन या युवकांना वठणीवर आणणार का? हे आता बघावं लागेल.

764
SHARES

Tags : , , ,

1 Responses

  1. Negative massage going towards nation
    It should be stop .by topmost priority

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close