AUDI KILLS ONE IN A FATAL ACCIDENT AT PONDA

Posted On March 13, 2017 By In Local, People, Top Stories


ऑडी कारच्या धडकेत पदचारी ठार, एक जखमी
फार्मागुडी उतरणीवरील अपघातानं घेतला बळी

फार्मागुडी उतरणीवर रस्त्याच्या बाजूनं चालत निघालेल्या दोघांना ऑडी कारची धडक बसल्यानं एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी प्रथम फोंडा उपआरोग्य केंद्रात आणि नंतर गोमेकॉत भरती करण्यात आलं. मयत इसमाचं नाव महादेव कुंभार असं असून नारायण रामा कुंभार असं जखमी इसमाचं नाव आहे. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते गोव्यात मोलमजुरी करायचे. दरम्यान ऑडी कार फोंड्याहून फर्मागुडीच्या दिशेने निघाली होती. उतरणीवर पोहोचताचं चालक ओमकार सत्यवान नाईक याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावरून खाली उतरली आणि हा अपघात झाला. यात ऑडी कारदेखील उलटली. घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

265
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close