Bal Rath drivers, attendants go for strike

Posted On October 18, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesबालरथ कामगारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू
पुढील आठ दिवस बालरथांना लागणार ब्रेक
‘बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी’
‘खासगी विद्यालयांकडून होणारा छळ थांबवावा’
‘कामगारांना दहा ऐवजी बारा महिन्यांचे वेतन द्यावे’
विविध मागण्यांसाठी बालरथ कामगारांनी छेडले आंदोलन

राज्यातील ३२६ सरकारी अनुदानित खासगी विद्यालयांतील बालरथांचे ८४४ चालक आणि मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आठ दिवस काम बंद आंदोलन जाहीर केलंय. या आंदोलनाची सुरुवात मंगळवारी आझाद मैदानावर करण्यात आली. यापुढील आठ दिवस हे सर्व कर्मचारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत.

बालरथ कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी. खासगी विद्यालयांच्या व्यवस्थापनाकडून बालरथ कर्मचाऱ्यांचा होणारा छळ थांबवावा. या कामगारांना दहा ऐवजी बारा महिन्यांचे वेतन द्यावे. त्यांचे वेतन थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा करावे, बालरथ कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरवावी अशा मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्याहेत.

212
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close