BANK OFFICIALS BRACE FOR CHAOS IN BRANCHES

Posted On November 10, 2016 By In Local, People, Top Stories


नोटा बदलण्यास आवश्यक यंत्रणा सक्रीय
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती
किनारी शॅक धोरण निश्‍चित; शुक्रवारी होणार ड्रॉ

बँकांमध्ये गुरुवारपासून ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी लोकांची होणारी धावपळ लक्षात घेता प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेण्यात आलीये. कुठलाही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस यंत्रणाही सतर्क करण्यात आलीये, अशी माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलिस महासंचालक मुक्तेश चंद्रा, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव उपस्थित होते.

दरम्यान, पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात आल्याचं समजताच दक्षिण गोव्यातील काही राजकारणांनी कार्यकर्त्यांना पैसे वाटण्यास सुरवात केलीये, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली असल्याचंही पार्सेकर यावेळी म्हणाले.

गोवा किनारी शॅक्स धोरण निश्‍चित करण्यात आलं असून त्याला मंजुरी देण्यात आलीये. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील किनार्‍यांवर उभारण्यात येणार्‍या ३६७ किनारी शॅक्सपैकी ३६४ शॅक्सना गोवा किनारी नियंत्रण व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आलीये. पाळोळे येथील तीन शॅक्सना प्राधिकरणानं परवानगी नाकारली. शुक्रवारी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सर्व ३६४ शॅक्सचे लॉटरी पद्धतीनं वाटप केले जाणार आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

213
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close