Biker’s Stunt Injures Two Girls at Marcel

Posted On July 1, 2017 By In Local, People, Top Stories


खांडोळा अपघातात दोन कॉलेज युवती जखमी
दोन दुचाकी चालकांच्या स्टंटबाजीचा परिणाम
बाहेरील युवक येऊन युवतींची काढताहेत छेड
खांडोळा कॉलेजबाहेर पोलिसांची नेमणूक करा
स्थानिकांची मागणी; युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खांडोळा शासकीय महाविद्यालयासमोर दुचाकीची शर्यत लावून स्टंटबाजी करणाऱ्या युवकांनी शनिवारी दोन कॉलेज युवतींना गंभीर जखमी केलं. या प्रकारामुळं परिसरात तणाव निर्माण झाला. कॉलेज सुटल्यानंतर रस्त्याकडेनं जाणाऱ्या युवतींना पाहुन या युवकांनी दुचाकींची स्टंटबाजी सुरू केली. यात दोन्ही युवतींना दुचाकीची जोरदार धडक बसून त्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये तिवरेच्या तेजस जल्मी आणि कुंभारजुवेच्या लालन जल्मी या युवतींचा समावेश आहे. या दोन्ही युवतींना वैद्यकीय उपचारासाठी गोमेकॉत भरती करण्यात आलं. यावेळी एक दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला असून दुसऱ्या दुचाकीवरील युवकानं तिथून पळ काढला. पोलिसांनी येऊन पंचनामा केला आणि चौकशीसाठी एका युवकाला ताब्यात घेतलं.

दरम्यान, कॉलेज सुटल्यानंतर बाहेर अनेक युवक युवतींची छेड काढण्यासाठी थांबलेले असतात. अशा युवकांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलीये.

242
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close