BJP LEADER SHOT DEAD MAN IN 2006 , CLAIMS EX- DRIVER

Posted On February 21, 2017 By In Crime, Local, People, Politics, Top Stories


शानू गावकरचा खून झाल्याच्या संशयाने खळबळ
विश्वजित कृ. राणे यांच्या माजी चालकाने केले आरोप
पोलिसांच्या तपासावर आयरिश यांनी व्यक्त केला संदेह
आयरिश यांनी मानवी हक्क आयोगाकडे केली तक्रार
आयोगानं मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना दिली नोटीस
येत्या २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश

बेपत्ता शानू गावकरच्या कथित खूनप्रकरणी मानवी हक्क आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना २८ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेत. पोलिसांचा तपास दबावाखाली चालू असून त्यांना समज द्यावी, अशी याचिका समाजकार्यकर्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी केली होती. याला अनुसरून ही नोटीस बजावण्यात आलीये.
गेल्या ११ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या सालेलीतील शानू गावकर यांचा खून झाल्याचा आरोप भाजपचे उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांचे माजी चालक सतीश अर्दाळकर यांनी केल्यानं राज्यात खळबळ माजलीये. याप्रकरणी समाजकार्यकर्ता आयरिश रॉड्रीग्स यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्यावर आयोगानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय. याप्रकरणी आयोगानं राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना २८ फेब्रुवारीला आयोगासमोर हजर राहण्याची नोटीस बजावलीये. दरम्यान, या प्रकरणात पर्ये मतदारसंघाचे भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यांनीच गोळ्या झाडून शानूचा खून केल्याचा आरोप अर्दाळकर यानं केलाय. अर्दाळकर यानं गोवा पोलिसांच्या फेसबुक पेजवर ही माहिती व्हायरल केल्यानं सोमवारी राजकीय वर्तुळातही खळबळ माजली. दरम्यान, बेपत्ता शानूचा खून झाल्याची जागा अर्दाळकर यांनी दाखवली असली तरी मृतदेह सापडलेला नाही. तसंच अर्दाळकर याने दिलेल्या व्यक्तींची जबानी घेतली जाताहे. याशिवाय आणखी कोणतेच पुरावे उपलब्ध नसल्यानं पोलिसांनी हे प्रकरण अजून नोंद करून घेतलेलं नाही. याप्रकरणी आयरिश यांनी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलीये. या तक्रारीत आयरिश यांनी पोलिसांचा तपास राजकीय दबावाखाली चालू असल्याचा संशय व्यक्त केला असून आयोगानं याची दखल घ्यावी, अशी मागणी केलीये.
———————
शानू गावकरचा खून झाल्याच्या संशयाने खळबळ
विश्वजित कृ. राणे यांच्या माजी चालकाने केले आरोप
राणे यांनी अर्दाळकराचे सर्व आरोप फेटाळले

दरम्यान, भाजप उमेदवार विश्वजित कृष्णराव राणे यांनी अर्दाळकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. या प्रकरणात माझा कोणताच हात नसून शानू आणि माझा दुरान्वयेही संबंध नसल्याचा खुलासा राणे यांनी केलाय.

223
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close