BJP’S VINAY TENDULKAR FILES NOMINATION; CONGRESS’ SHANTARAM NAIK FILED HIS NOMINATION

Posted On July 11, 2017 By In Local, People, Top Stories


राज्यसभेसाठी तेंडुलकर यांचा उमेदवारी अर्ज सादर
कॉंग्रेसतर्फे पुन्हा शांताराम नाईक यांनाच उमेदवारी
तेंडुलकर विरुद्ध शांताराम यांच्यात रंगणार सामना
यावेळेस गोव्यात राज्यसभा निवडणुकीत इतिहास घडेल
भाजप उमेदवार विनय तेंडुलकर यांची प्रतिक्रिया

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी राज्यसभेसाठी मंगळवारी उमेदवार अर्ज सादर केला. तर कॉंग्रेसतर्फे पुन्हा एकदा शांताराम नाईक यांनाचं उमेदवारी देण्यात आली असून त्यांनीदेखील मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यामुळं गोव्यात राज्यसभेसाठी तेंडुलकर विरुद्ध नाईक यांच्यात चुरशीची लढत होणाराहे. राज्यसभेचे खासदार म्हणून २००५ पासून काँग्रेसचे शांताराम नाईक यांनी राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर तेंडुलकर यांनी यावेळी राज्यसभा निवडणुकीत इतिहास घडेल, अशी प्रतिक्रया व्यक्त केलीये.

कॉंग्रेस उमेदवार शांताराम नाईक हे राज्यसभा निवडणुकीत हॉट्रीक करतील, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

267
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close