ALL BRAND PROMOTION SCAM : GOA POLICE TO GO TO MAHARASHTRA FOR INVESTIGATION

Posted On September 20, 2016 By In Local, People, Top Storiesऑल ब्रॅन्ड प्रमोशन फसवणूक प्रकरण
गोव्याचे तपास पथक महाराष्ट्रात रवाना
तक्रारदारांनी घेतली तपास अधिकाऱ्यांची भेट

ऑल ब्रॅन्ड प्रमोशन फसवणूक प्रकरणी मुख्य संशयितांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हा विभागाचं पथक महाराष्ट्रात रवाना झालंय. या प्रकरणी ५४१ जणांकडून सुमारे १ कोटी ५७ लाख ८३ हजार ४३३ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हा विभागात दाखल झाल्या आहेत. या सर्व तक्रारदारांनी मंगळवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन, तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी एक पथक महाराष्ट्रात गेल्याची माहिती देण्यात आली.

आर्थिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी कंपनीने वाहनांवर जाहिराती लावून पैसे कमविण्याचे आमीष दुचाकी तसेच चारचाकी मालकांना दाखवले होते. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समीर विराणी याचे सर्व दस्तावेज बनावट तसेच, त्याने अनेक नाव वापरून लोकांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मुंबई येथील समीर विराणी तसेच त्याच्या इतर साथीदारांची शोध घेण्यासाठी हे पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे. आॅल ब्रॅन्ड प्रमोशन च्या नावाखाली दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर जाहिरात लावून, पैसे कमविण्याचे आमीष दाखवून राज्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक नागरिकांची फसवणूक केलीये.

247
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close