[BREAKING NEWS] BRIBERY CASE AGAINST GOA IPS OFFICER

Posted On August 11, 2016 By In Crime, Local, People, Top Storiesवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात लाच घेतल्याची तक्रार
तक्रार नोंदवण्यासाठी पाच लाखांची लाच घेतल्याचा आरोप
मुन्नालाल हलवाई यांनी एसीबीकडे दिली रीतसर तक्रार
तक्रारीची प्रत मुख्यमंत्र्यांना सादर

फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून घेण्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मुन्नालाल हलवाई यांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडं दाखल केलीये. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनादेखील सादर केलीये.

दरम्यान, यापूर्वी राज्यातील हवालदार, कॉन्स्टेबल्स लाच घ्यायचे. आता आयपीएस अधिकारीही लाच घेऊ लागल्यानं गोवेकर अचंबित झालेत. ही आयपीएस अधिकारी वेगवेगळ्या पदावर जीवाचा गोवा करण्यासाठी येतात आणि गडगंज संपत्ती जमवून मालमत्ता उभी करतात, असा आजवरचा गोवेकरांचा अनुभव आहे. तोच कित्ता आता हा पोलीस अधिकारी गिरवतोय की काय, असा सवाल नागरिकांतून विचारला जाताहे. आता अशा पोलीस अधिकाऱ्यावर गृहमंत्री काय कारवाई करणार? याकडे गोवेकरांच्या नजरा लागून आहेत.

279
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close