BURIED BODY MYSTERIOUSLY GOES MISSING FROM GRAVEYARD AT SANKHLIM

Posted On March 4, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


कब्रस्तानातून मृतदेह झाला गायब
दत्तवाडी-साखळीतील प्रकारानं माजली खळबळ
करीम अहमद अत्तर यांचा मृतदेह गायब
दहा दिवसांपूर्वी करीम यांचे झाले होते निधन
दहाव्या दिवशी अंत्यविधीच्या वेळी आले उघडकीस
मृतदेहाचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आवाहन

साखळी पालिका क्षेत्रातील मुजावरवाडा दत्तवाडी कब्रस्तानातील एक मृतदेह गायब झाल्यानं शनिवारी खळबळ माजली. दहा दिवसांपूर्वी परिसरातील करीम अहमद अत्तर या ५६ वर्षीय गृहस्थाचं निधन झालं होतं. त्यांचा मृतदेह या कब्रस्तानात दफन करण्यात आला होता. मुस्लीम समाजाच्या रीतीरिवाजप्रमाणे मृत व्यक्तीच्या दहाव्या दिवशी त्याच्या कबरीवर काही विधी केले जातात. शनिवारी करीम यांच्या कबरीवर विधी करण्यासाठी त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आली असता त्यांना कबरीजवळ खोडलेली माती आणि हातमोजे दिसून आले. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीनं येऊन कबरीचं खोदकाम केलं असता करीम यांचा मृतदेह गायब झाल्याचं आढळून आलं. हे खोदकाम करताना साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी देखील उपस्थित होते. दरम्यान, हा मृतदेह कोणी नेला, त्यामागचा उद्देश काय? आदी गोष्टींचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलंय.

563
SHARES

Tags : , , , ,

1 Responses

  1. Informative

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close