‘शापोरा रिव्हर फ्रंट’ला हरित लवादाने लावला चाफ पुढील आदेश देईपर्यंत प्रकल्प ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश ‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्प बेकायदेशीरच ‘सीआरझेड’नं दिला होता हरित लवादला अहवाल बांध बांधण्याच्या नावाखाली जेटी उभारण्याचा घाट जनतेचा विरोध डावलून आणि कायद्यांची पायमल्ली करून सरकारनं प्रकल्प आखत आहे कि काय, असा संभ्रम सध्या शिवोलीतील नागरिकांमध्ये निर्माण झालाय. कारण सरकारनं आखलेला ‘शापोरा रिव्हर फ्रंट’ प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा अहवाल चक्क गोवा किनारी नियमन प्राधिकरणानं राष्ट्रीय हरित लवादाला सादर केलाय. या अहवालामुळं लवादानं हा प्रकल्प पुढील आदेश मिळेपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिलाय.
Read More मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याला पुन सेवेत घेतल्याचे प्रकरण आम आदमी पक्षाचा सचिवालयावर धडक मोर्चा २० हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन केले सादर मेव्हण्याला त्वरित सेवेतून काढून टाकण्याची मागणी लाचप्रकरणात निलंबित केलेल्या मेव्हण्याला स्वत:च्या अधिकाराचा वापर करून मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पर्वरी सचिवालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी मेव्हण्याला त्वरित सेवेतून कमी करण्याची मागणी त्यांनी केली. याविषयी २० हजार स्वाक्षऱ्यांचं निवेदनही सादर केलं.
Read More ‘फुटबॉल भक्ताचा ‘फिव्हर’ श्री सिद्धेश्वराच्या मूर्तीला घातला ‘क्रॉस’ उगे गावात निर्माण झाला तणाव पोर्तुगालने युरो चषक पटकावल्याचा झाला उन्माद संशयित लुकास कार्व्हालो पोलिसांच्या ताब्यात घटनेमुळे देवाचे पावित्र्य भंग झाल्याचा देवस्थान समितीचा दावा फ्रान्सवर ऐतिहासिक मात करोत पोर्तुगालनं युरो चषक पटकावल्यावर एका ‘फुटबॉल भक्ता’नं उगेतील श्री सिद्धेश्वर देवाच्या मूर्तीवर क्रॉस घातला. या प्रकारानं सोमवारी सांगे भागात खळबळ माजली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन लुकास कार्व्हालो या संशयित युवकाला अटक केली असता, त्यानं या कृत्याची कबुली दिली आणि तणाव निवळला. दरम्यान, या युवकाला कोणी फूस लावून हे कृत्य करायला लावलं का? याची
Read More ‘ज्योतिर्मय गोवा’ योजनेचा थाटात शुभारंभ प्रत्येक कुटुंबाला तीन एलईडी दिले मोफत मोफत एलईडी मिळवण्यासाठी उडाली झुंबड गोवा सरकारनं आखलेल्या ‘ज्योतिर्मय गोवा’ योजनेचा शुभारंभ शुक्रवारी २५ ठिकाणी करण्यात आला. यावेळी वीज ग्राहकांना तीन एलईडी बल मोफत देण्यात आले. ही योजना पुढील दहा दिवस राज्यातील २२७ ठिकाणी चालू राहणाराहे.
Read More चालत्या कारने पेट घेतल्याने खळबळ सांताक्रूझ-बांबोळी रस्त्यावरील प्रकार पेटलेल्या कारमुळं अर्धातास वाहतूक ठप्प दुर्घटनेनंतर कारचालकाचे पलायन आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात सांताक्रूझ-बांबोळी रस्त्यावर चालत्या कारला आग लागल्यानं शनिवारी सकाळी खळबळ माजली. ही कार सांताक्रूझहून बांबोळीच्या दिशेनं निघाली होती. या घटनेमुळं या मार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली. घटनेची माहिती मिळताचं अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग विझवली अन वाहतूक सुरळीत केली. या दुर्घटनेत संपूर्ण कार जळून खाक झाली. आग नेमकी कशामुळं लागली, हे अद्याप समजलेलं नाही. शिवाय कारला आग लागण्यानंतर चालकानंही तिथून पलायन केलं. त्यामुळं सर्वच प्रकार संशयास्पद वाटत आहे.
Read More कॅसिनोमुळे राज्याचा विकास महसूल वाढला, रोजगार मिळाला मुख्यमंत्री पार्सेकर यांनी उचलली तळी कॅसिनो कॉंग्रेसची देण, आम्ही सांभाळतो सार्दिन, रवी नाईक यांनी आणले कॅसिनो मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पुन्हा वाजवले तुणतुणे नियमांचं उल्लंघन करून पाचव्या कॅसिनोला परवागनी दिल्यानं वनखात्यानं त्याला जोरदार आक्षेप घेतलाय; मात्र मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुन्हा तेच तुणतुणे वाजवलं. कॅसिनोमुळं राज्याचा महसूल वाढला, अनेकांना रोजगार मिळाला. त्यामुळं कॅसिनोची राज्याला गरज आहे, असं स्पष्टीकरण पार्सेकर यांनी दिलंय. हे स्पष्टीकरण करताना, कॅसिनो ही कॉंग्रेसची देण असल्याचं सांगायला पार्सेकर विसरले नाहीत. फ्रान्सिस सार्दिन आणि रवी नाईक यांच्या कारकिर्दीत कॅसिनो गोव्यात आल्याचं पार्सेकर
Read More इंग्रजी माध्यमाला अनुदान दिल्याचे प्रकरण अनुदान बंद करण्याचे वचन दिलेच नव्हते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची शब्दखेळी ‘मातृभाषेला प्रोत्साहन देऊ’, असे वचन दिले जादूगाराप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी बदलले शब्दांचे अर्थ वचननाम्यातील वचनाचा चार वर्षांनी भावार्थ केला स्पष्ट भाजपची भ्रमित करण्याची चलाखी, जादूगारालाही टाकले मागे शब्दांनी संमोहित करून भाषाप्रेमींना भुलवलं ‘इंग्रजी माध्यमाच्या १३४ शाळांना दिलं जाणारं अनुदान बंद करू’, असं आश्वासनं कधीचं भाजपनं दिलं नव्हतं, ‘मातृभाषेतून शिक्षण असावं’, हेच सरकारचं धोरण आहे, अशाप्रकारे शाब्दिक खेळ रचून भाषाप्रेमींना भ्रमित करण्याचा प्रयत्न चलाख बनलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय. ‘शब्द’ आणि ‘अर्थ’ यांचा घनिष्ट संबंध असतो.
Read More आपत्काळाला तोंड देण्यासाठी सुसज्ज वाहन अग्निशामक दलाच्या ताफ्यात नवे वाहन दाखल केंद्र सरकारच्या योजनेखाली मिळालं वाहनं आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज अशी दोन वाहनं गोवा अग्निशामक दलाच्या ताफ्यात दाखल झालीयेत. केंद्र सरकारनं आखलेल्या योजनेखाली हे वाहनं दलाला मिळाले. आपत्काळ कधी, कुठे येईल, हे सांगता येत नाही, पण तो जेव्हा येतो तेव्हा प्रचंड संहार घडवूनच जातो. त्यामुळं आपत्काळाला तोंड देण्यासाठी माणसानं सदैव तत्पर असलं पाहिजे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं अग्निशामक दलाला एक अत्याधुनिक वाहनं प्रदान केलंय. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची यंत्रणा या वाहनात
Read More ‘ऊर्जेची बचत, देशाचा विकास’ हा मंत्र घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘उजाला’ योजना आखलीये. गोवा सरकारनं ही योजना ‘ज्योतिर्मय गोवा’ या नावानं शुक्रवारपासून चालू केलीये. या योजनेला पहिल्याच दिवसांपासून प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचं ठिकठिकाणी दिसून येताहे. पर्वरी इथं शनिवारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळं आयोजकांचीही धांदल उडाली. ही योजना पहिल्याचं दिवशी इतकी लोकप्रिय होईल, याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती. याच कारणानं आयोजकही गोंधळेत. त्यामुळं अवघ्या काही तासांतच एलईडी दिव्यांचा तुटवडा भासला. असं असलं तरी प्रत्येक कुटुंबाला तीन एलईडी मोफत देण्याचा संकल्प सरकारनं घेतलाय. त्यामुळं
Read More पर्वरीत राष्ट्रीय महामार्गावर नवा बसथांबा पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी केली पायाभरणी पर्वरी भागात सौंदर्यीकरणाचे काम सध्या वेगानं सुरू आहे. या कामाअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील ‘आरजी स्टोन’जवळ नवा बसथांबा उभारण्यात येताहे. या कामाचा शुभारंभ पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
Read More