Politics Category

vlcsnap-2017-06-29-19h16m48s867
बांधकाममंत्र्यांचा शांताराम नाईक यांच्यावर घणाघात नाईक यांना राज्यसभेवर पाठवणे ही गंभीर चूक राज्यसभा खासदार असूनही गोव्यासाठी काहीही केले नाही मंत्री सुदिन ढवळीकर यांची घणाघाती टीका बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्यावर जाहीर कार्यक्रमात शाब्दिक टोले हाणले. २०१२ पूर्वी राज्यावर कॉंग्रेसचं शासन होतं. केंद्रातही कॉंग्रेस शासन होतं. त्यामुळं राज्यसभेवर शांताराम नाईक यांना पाठवण्यात आलं. पण नाईक यांनी गोव्यासाठी कोणतंही भरीव काम केलं नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवल्याची आम्हाला खंत वाटते, अशी झणझणीत टीका मंत्री ढवळीकर यांनी यावेळी केली.Read More
vlcsnap-2017-06-29-19h05m54s715
मंत्री डिसोझांचे म्हापशाकडे दुर्लक्ष कॉंग्रेस नेते विजय भिके यांची टीका उत्तर गोव्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हापसा शहराची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून स्थानिक आमदारांचे याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका म्हापसा कॉंग्रेस गटाध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी समितीचे सुदिन नाईक, चंदन मांद्रेकर आणि महाबळेश्वर तोरस्कर उपस्थित होते.Read More
vlcsnap-2017-06-27-20h08m41s598
गिरीश चोडणकर यांनी वाळपईत निवडणूक लढवावी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे जाहीर आव्हान कॉंग्रेस पक्ष पूर्णपणे खिळखिळीत बनला आरोग्यमंत्री राणे यांनी काढला चिमटा कॉंग्रेस प्रवक्ते गिरीश चोडणकर यांनी वाळपईत जाऊन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर खरमरीत टीका केल्यावर मंत्री राणे यांनी मंगळवारी चोडणकर यांच्यावर जोरदार टोमणे मारले. चोडणकर यांच्यात हिम्मत असल्यास त्यांनी वाळपई मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असं आव्हानही मंत्री राणे यांनी यावेळी दिलं.Read More
Nilkanth Bhomkar
  जुने गोवेच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव संमत सरपंच निवडीनंतर २४ तासांत संगीत खुर्चीचा खेळ चालू सरपंचाची निवड होताच ठेवला होता अविश्वास तिसवाडी तालुक्यातील महत्त्वाची पंचायत असलेल्या जुने गोवे पंचायतीवर नव्या पंचायत मंडळाची स्थापन होण्याअगोदरच सत्तेसाठी संगीतखुर्चीचा खेळ चालू झालाय. ही खुर्ची मिळवण्यासाठी राजकीय कारस्थाने रचली जाताहेत. यातूनच शनिवारी नवनिर्वाचित सरपंच नीळकंठ भोमकर यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव संमत करण्यात आला. त्यामुळं पदाभर हाती घेण्याआधीच भोमकर यांची गच्छति झालीये. आता या ठिकाणी नव्यानं सरपंचांची निवड करावी लागणाराहे.Read More
vlcsnap-2017-06-22-17h51m08s702
LOBO FELICITATES NEWLY ELECTED MEMBERS OF CALANGUTE P’YATRead More
vlcsnap-2017-06-21-20h00m57s823
देशातील निधर्मी राज्यप्रणालीवर होताहेत आघात प्रदेश कॉंग्रेस राबवणार स्वाक्षरी मोहीम राष्ट्रपतींना देणार निवेदन : लुईझिन फालेरो साध्वी सरस्वती यांच्या विरोधात एफआयआर दाखल करा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन यांची सरकारकडे मागणी गोव्याबरोबरच देशभरात निधर्मी राज्यप्रणालीवर आघात होत असून अल्पसंख्याकांची सुरक्षाही धोक्यात आलीये. याबाबत लवकरच स्वाक्षरी मोहीम राबवून राष्ट्रपतींना निवेदन सादर केलं जाईल, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार लुईझिन फालेरो यांनी पत्रकार परिषदे दिली. यावेळी साध्वी सरस्वती यांचाही फालेरो यांनी निषेध केला. साध्वीच्या विरोधात सरकारनं एफआयआर दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.Read More
vlcsnap-2017-06-21-19h53m12s758
नव्या कोकणी-मराठी शाळांना परवानगी नाकारली ‘भाभासुमं’ने सरकारवर डागली झणझणीत तोफ कोकणी – मराठी शाळांच्या अनुदान योजना निव्वळ कागदावरच प्रा. सुभाष वेलिंगकर यांची घणाघाती टीका नव्या कोकणी आणि मराठी शाळांना परवानगी नाकारून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारतीय भाषांवर अन्याय केल्याची टीका भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलीये. राज्य सरकारनं कोकणी आणि मराठी शाळांसाठी अनुदान देण्याची घोषणा केली होती; मात्र या घोषणेचा एकही पैसा अद्याप शाळांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप वेलिंगकर यांनी यावेळी केला.Read More
vlcsnap-2017-06-21-19h50m18s694
‘मोदी फेस्ट’च्या जाहिरात वाहनांचे उद्घाटन राजधानीत होणार ‘मोदी फेस्ट’ केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या प्रगतीचा देणार आढावा केंद्रात सत्तेत येऊन मोदी सरकारला यंदा तीन वर्षे पूर्ण झालीये. यानिमित्त देशभरात ‘मोदी फेस्ट’चं आयोजन केलं जाताहे. राजधानी पणजीतही ही फेस्ट होणार असून यासाठी प्रदेश भाजपतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येताहे. याचाच एक भाग म्हणून दक्षिण गोव्यात डिजिटल जाहिरात वाहन फिरणार आहे. या वाहनाचं उद्घाटन खासदार नरेंद्र सावईकर यांच्या हस्ते बुधवारी फोंड्यात करण्यात आलं.Read More
vlcsnap-2017-06-21-19h46m57s106
AAP CRITICIZES COMMON MINIMUM PROGRAMMERead More
vlcsnap-2017-06-20-20h22m32s864
CALANGUTE P’YAT DOES ‘SHUDDHIKARAN’ OF ITS OFFICE FROM CORRUPTION!Read More
Close