Politics Category

‘पक्षात राहायचे असेल तर, पक्षाचे ऐका’ अन्यथा राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडा उपमुख्यमंत्र्यांच्या आमदार लोबो यांना कानपिचक्या आमदार मायकल लोबो यांनी भाजप मंत्रीमंडळावर जोरदार प्रहार केल्यानं भाजपच्या मंत्र्यांच्या ह्रदयाला जोरदार ठेच पोहोचलीये. मंत्रीमंडळातील चार मंत्री सोडल्यास बाकीचे सगळे मंत्री बिनकामाचे असल्याची टीका लोबो यांनी केली होती. याला उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिलंय. पक्षापेक्षा व्यक्ती मोठी नाही. पक्षात राहायचे असेल तर पक्षाच्या धोरणाप्रमाणे काम करावे लागले. पक्षाचे ऐकायचे नसल्यास त्यांनी राजीनामा देऊन पक्षातून बाहेर पडावे, अशी प्रतिक्रिया डिसोझा यांनी व्यक्त केलीये.Read More
रमेश तवडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ‘आम आदमी’नं दिली पंधरा दिवसांची मुदत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला इशारा काणकोणचे वनअधिकारी परेश परब यांनी २००९ साली तत्कालीन आमदार रमेश तवडकर यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी काणकोण पोलिसांनी शुक्रवारी कृषीमंत्री तवडकर यांच्याविरुध्द येथील प्रथमश्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलंय. या कारणानं तवडकर यांनी पंधरा दिवसांत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा आम आदमी पक्षानं दिलाय.Read More
‘पिळर्ण सिटीझन’च्या कार्यकर्त्यांचा ‘आप’ प्रवेश केजरीवालांच्या भाषणाने झाले प्रभावी पिळर्ण सिटीझन फोरमचे नेते प्रकाश भंडारकर यांनी ३०० कार्यकर्त्यांसह शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. २२ में रोजी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विचार ऐकून प्रभावित झाल्यानं पक्षात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया यावेळी भंडारकर यांनी दिली.Read More
वयोमानामुळे रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी डागली तोफ सत्ता असताना रवी नाईक यांनी काहीही केले नाही सत्ता गेल्यानंतर आठवला विकास : बांधकाममंत्री वय झाल्याने माजी गृहमंत्री रवी नाईक यांची बुद्धी भ्रष्ट झालीये. त्यामुळं ते सध्या काहीही बरळत आहेत, अशी झणझणीत प्रतिक्रिया बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केलीये. फोंड्यातील सर्व विकासकामे मीच केल्याचा दावा रवी नाईक यांनी केला होता. त्याला ढवळीकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.Read More
Hasina comments came after three operatives of the outlawed Jamaat ul Mujahideen Bangladesh (JMB) were killed in two predawn security raids early yesterday in Dhaka and north-western Rajshahi while another member of the outfit was killed overnight at Shibganj sub-disrict in north west Bogra. Prime Minister Sheikh Hasina today promised to intensify a nationwide anti-terror clampdown, a day after a Hindu priest was hacked to death by IS jihadists in Bangladesh which has seen a series of brutal attacks by Islamists on minorities and secular activists. “If they (militants) thinkRead More
स्वातंत्र्यसैनिकांचा दुहेरी नागरिकत्वाला कडाडून विरोध दुहेरी नागरिकत्वाचा प्रकार संविधानातच नाही सत्ता बळकावण्यासाठी केली जाताहे संविधानाची मोडतोड दुहेरी नागरिकत्व असणे हा गंभीर गुन्हा गोव्यातील वातावरण बिघडवण्याचा पोर्तुगीजांचा डाव स्वातंत्र्यसैनिक नागेश करमळी यांची टीका दुहेरी नागरिकत्व असणे हाच मुळात गुन्हा असून हा प्रकार देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा आहे. अशा महाभागांविषयी मवाळ धोरण न बाळगता त्यांना कडक शिक्षा करणे गरजेचे आहे, अशी झणझणीत प्रतिक्रिया स्वातंत्र्यसैनिक नागेश करमळी यांनी व्यक्त केलीये. पणजी इथे स्वातंत्र्यसैनिक संघटनेतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर नागवेकर आणि चंद्रकांत पेडणेकर उपस्थित होते.Read More
‘गोवा प्रजा’ लढणार २६ जागा मराठी राजभाषेच्या मुद्यावरून लढा देणार पक्षाचा नेत्यांनी केली घोषणा येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत २६ जागांवर लढण्याचा निर्धार ‘गोवा प्रजा’ या नव्या पक्षानं केलाय. मराठी राजभाषा आणि मातृभाषेतून शिक्षण या दोन मुद्दांवर ही निवडणूक लढवली जाईल, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
नियमांचे उल्लंघन करून अपंग आयुक्तांची नियुक्ती सरकारनं फौजदारी गुन्हा दाखल करावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांचा हात असल्याचा आरोप सर्व नियम धाब्यावर बसवून, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी, अपंग आयुक्तपदी अनुराधा जोशी यांची नियुक्त केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून तथ्य बाहेर येणे गरजेचे आहे. यासंदर्भात लवकरच अभ्यास करून फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला.Read More
नियोजित बेतुल बंदर, शापोरा जेटीला विरोध माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी डागली तोफ मुरगाव बंदराचा आणखी विकास करता येत नसल्यानं आता बेतुल इथं नवे बंदर विकसित करण्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केंद्रीय बंदर तसंच भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलीये. या प्रकल्पाला माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी जोरदार विरोध दर्शवला. त्याचबरोबर शापोरा इथं जेटी उभारण्यासही त्यांनी विरोध दर्शवला.Read More
नायजेरियनांना देशातून हाकलून लावा माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची मागणी देशात नायजेरीयन नागरिकांची वाढली दादागिरी शिक्षणासाठी येतात आणि अवैध धंदे करतात रवी नाईक यांनी डागली केंद्र सरकारवर तोफ नायजेरियन लोकांची गोव्यासह देशभरात दादागिरी चालू असून त्यांना केंद्र सरकारनं त्वरित हाकलून द्यावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शिक्षणाच्या नावाखाली गोव्यात येऊन नायजेरियन युवक गुन्हे करत असल्याचा दावाही यावेळी नाईक यांनी केला.Read More
Close