Politics Category

मांडवी नव्या कॅसिनोला परवानगी नाही राज्यात पंधरा दिवसांत गेमिंग कमिशन स्थापन करणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे आश्वासन राज्यात गुंतवणूक धोरणाच्या नावाखाली कॅसिनोला प्रोत्साहन देणाऱ्या भाजपनं अद्याप गेमिंग आयोग स्थापन केलेला नाही. आता हा आयोग पंधरा दिवसांत स्थापन केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलंय. कॅसिनोसाठी गेमींग आयोग आणि गोमंतकीयांना कॅसिनोवर बंदी हे विधेयक २०१२ मध्ये आणलं होतं, पण अद्यापपर्यंत त्यावर काहीच झालेलं नाही. …………………………………Read More

Posted On June 19, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

HUNGER STRIKE BY BBSM

‘भाभासुमं’तर्फे क्रांतिदिनी राज्यात लाक्षणिक उपोषण इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनुदान बंद करण्याची मागणी इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान बंद करण्याकरिता सरकारला दिलेली ६ जून ही मुदत सरकारनं धुडकावल्यानं संतप्त बनलेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचनं क्रांतीदिनी राज्यात १९ प्रभाग-केंद्रांत ‘लाक्षणिक उपोषण’ करण्यात आलं. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या लाक्षणिक उपोषणास ३ हजारपेक्षा जास्त महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते.Read More
‘दुहेरी नागरिकत्व’ संविधानाच्या विरोधातच ‘दुहेरी नागरिकत्व’ हिंदुस्थानसाठी घातकच बांधकाममंत्री ढवळीकर यांची जाहीर प्रतिक्रिया फोंड्यात ढवळीकरांनी हुतात्म्यांना केले वंदन गोव्यातील पोर्तुगीजधार्जिण्यांना खुश करण्यासाठी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारनं अगदी संविधानासुद्धा तिलांजली देण्याचा घाट घातलाय. या प्रकारावर मगोचे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी क्रांतीदिनी जाहीर सभेतून टीका केलीये. ‘दुहेरी नागरिकत्व’ हा प्रकार संविधानाच्या विरोधात असल्याचं प्रतिपादन मंत्री ढवळीकर यांनी केलंय.Read More

Posted On June 18, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

FIFTH CASINO IN RIVER MANDOVI

पाचव्या कॅसिनोविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया तो नवा नव्हे, जुनाच कॅसिनो नव्या कॅसिनोला परवाना देणार नाही मुख्यमंत्री पार्सेकर यांनी केले ‘ट्विस्ट’ दरम्यान, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पाचव्या कॅसिनोचं समर्थनं केलंय. हा कॅसिनो नवा नाही. तो जुना कॅसिनो असून, काही कारणास्तव तो बंद होता. त्यामुळं सरकारनं नवीन कॅसिनोला मान्यता दिली, असं म्हणता येणार नाही. सरकार नवीन कॅसिनोला मांडवीत परवागनी देणार नाही, असा युक्तिवाद पार्सेकर यांनी केला. रायबंदरच्या मच्छीमारांनी केला कॅसिनोला विरोध रायबंदरमधून कॅसिनो त्वरित हटवण्याची मागणी मांडवीत रायबंदरच्या बाजूला भाजप सरकारनं कॅसिनोला मान्यता दिल्यानं स्थानिक मच्छीमार संतप्त बनलेत. हा कॅसिनो तिथून त्वरितRead More
सरकारी नोकरीसाठीची वयोमर्यादा ४५ मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावावर शिक्कामोर्तब राज्य सरकारी प्रशासनात केवळ वयोमर्यादेमुळे नोकरीपासून वंचित राहिलेल्यांना एक शेवटची संधी प्राप्त होण्यासाठी सरकारनं खूषखबर दिलीये. सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा आता ४२ वरून ४५ करण्याचे सरकारनं ठरवलंय. शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.Read More
गोव्याचे नवे एजी सरेश लोटलीकर अतिरिक्त एजी पदी दत्तप्रसाद प्रभूलवंदे म्हादईची लढाई नाडकर्णीच लढणार मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती राज्याचे नवे अॅडव्होकेट जनरल म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांची नियुक्ती करण्यात आलीये. शुक्रवारी मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्याचबरोबर अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल म्हणून अॅड. दत्तप्रसाद प्रभूलवंदे यांची नियुक्ती करण्यात आलीये. आत्माराम नाडकर्णी यांची भारताचे सॉलीसीटर जनरल म्हणून नियुक्ती झाल्यानं गोव्याचे अॅडव्होकेट जनरलपद रिक्त झालं होतं. दरम्यान, म्हादई जलतंटा लवादासमोर आजपर्यंत अॅड. नाडकर्णी यांनी गोव्याची दमदार बाजू मांडलीये. त्यामुळं गोव्याच्या वतीनं ही लढाई पुढे त्यांनीच लढावी, अशीRead More

Posted On June 15, 2016By Akshay LadIn Local, People, Politics, Top Stories

BBSM LIKELY TO ENTER THE FRAY

‘भाभासुमं’तर्फे क्रांतिदिनी राज्यात लाक्षणिक उपोषण सरकारविरोधात आंदोलन करणार आणखी तीव्र इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना दिलं जाणारं अनुदान बंद करण्याकरता सरकारला दिलेली ६ जून ही मुदत धुडकावल्यानं ‘भारतीय भाषा सुरक्षा मंच’नं तीव्र संताप व्यक्त केलाय. या विरोधात गोवा क्रांतिदिनी राज्यात १९ ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.’भाभासुमं’ निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी केले सुतोवाच दरम्यान, भाजप शासनानं भारतीय भाषांच्या विरोधात धोरण चालू ठेवल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय भाषा सुरक्षा मंच उतरण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. विद्यमान परिस्थितीत वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, आमदार विष्णू वाघ आणि केंद्रीयRead More
‘सनातन’ला दहशतवादी घोषित करा बांधकाममंत्री करताहेत सनातनला साहाय्य कॉंग्रेस प्रवक्ता सुनील कवठणकर यांचा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनप्रकरणी सनातन संस्थेचे साधक वीरेंद्र तावडे यांना अटक झाल्यानं सध्या देशभरात खळबळ माजलीये. तावडे आणि मडगाव स्फोट प्रकरणातील संशयित यांचा संबंध असल्याचंही आता समोर आलंय. त्यामुळं या संघटनेला दहशदवादी घोषित करून त्यांच्यावर बंदी घालावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ता सुनील कवठणकर यांनी केलीये. बांधकाममंत्र्यांचे कुटुंब या संस्थेला पाठिंबा देत असल्यानं भाजप सरकार या संघटनेला पाठीशी घालत असल्याचा आरोपही कवठणकर यांनी केलाय.Read More
पर्यटनाला चालना देण्यासाठी शापोरा प्रकल्पाचा प्रस्ताव मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा खुलासा शापोरा नदीकाठी सात जागांवर पर्यावरण पूर्वक पर्यटन व्यवसायला चालना दिली जाणाराहे. त्यासाठी शापोरा रिव्हर फ्रंट प्रकल्पाला सरकार चालना देताहे. मात्र काही मंडळी यात खो घालत आहेत. सरकारविरोधात गैरसमज पसरवत आहेत, असा खुलासा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलाय.Read More
वेरे-वाघुर्मे पंचायत घराची मोडतोड फोंडा पोलिसांत तक्रार दाखल पंचायत घरात टाकला कचरा वेरे-वाघुर्मे पंचायत घराची गावातील एका व्यक्तीनं तोडफोड करून आतमध्ये कचरा टाकला. या प्रकारामुळं पंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरलीये. हा प्रकार करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे काहींचे म्हणणे आहे; मात्र त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचा आरोप एका ग्रामस्थानं केलाय. त्या व्यक्तीला कडक शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केलीये. दरम्यान, याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.Read More
Close