People Category

vlcsnap-2017-06-29-19h55m37s683
खाण घोटाळाप्रकरणी कांचा गौंडरला पोलीस कोठडी कोट्यवधींचा खनिजमाल लंपास केल्याचा संशय एसआयटीनं ठोकला गौंडरला बेड्या बेकायदेशीर खाण चालवून कोट्यवधी रुपयांच्या खनिजमालाची चोरी केल्याप्रकरणी खाण मालक कांचा गौंडर याला एसआयटीनं बेड्या ठोकल्या. गुरुवारीत याला पणजी न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीये.Read More
vlcsnap-2017-06-29-19h42m52s736
‘गुंतवणूक मंडळा’नं दिलेले परवाने रद्द होणार नाहीत १३ आणि १४ व्या बैठकीतील मुद्दयांची होणार पुनर्तपासणी कार्यकाळ संपल्यावरही मंडळाच्या सदस्यांनी दिले होते परवाने ‘केपीएम’च्या पुनर्तपासणीनंतर परवान्यांवर होणार विचार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पत्रपरिषदेत माहिती १४व्या बैठकीतील आठ उद्योगांची होणार पुनर्तपासणीRead More
vlcsnap-2017-06-29-19h25m02s071
जायकाअंतर्गत सर्व कामे २०१८ पर्यंत होणार पूर्ण उंडिरमधील सांडपाणी प्रकल्पाला विरोध गैरसमजातून बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची प्रतिक्रिया राज्यात जायकाअंतर्गत सुरू असलेले सर्व प्रकल्प मार्च २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थिती पूर्ण केले जातील, अशी ग्वाही बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर उंडिरमध्ये सांडपाणी प्रकल्पाला होणारा विरोध निव्वळ गैरसमजातून असल्याची प्रतिक्रिया मंत्री ढवळीकर यांनी केली.Read More
45039937
वेस्टर्न बायपासमुळे नावेली, मडगावातील वाहतूक कोंडी सुटणार महिनाभरात वेस्टर्न बायपासचे काम होणार सुरू : बांधकाममंत्री मडगाव ते नावेली भागातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वेस्टर्न बायपास बांधला जाणाराहे. या १६० कोटींच्या वेस्टर्न बायपासचं काम महिनाभरात सुरु होईल. त्याचबरोबर बोरी पुलाचं काम वर्षभरात सुरू केलं जाईल, अशीही माहिती मंत्री ढवळीकर यांनी यावेळी दिली.Read More
vlcsnap-2017-06-29-19h16m48s867
बांधकाममंत्र्यांचा शांताराम नाईक यांच्यावर घणाघात नाईक यांना राज्यसभेवर पाठवणे ही गंभीर चूक राज्यसभा खासदार असूनही गोव्यासाठी काहीही केले नाही मंत्री सुदिन ढवळीकर यांची घणाघाती टीका बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्यावर जाहीर कार्यक्रमात शाब्दिक टोले हाणले. २०१२ पूर्वी राज्यावर कॉंग्रेसचं शासन होतं. केंद्रातही कॉंग्रेस शासन होतं. त्यामुळं राज्यसभेवर शांताराम नाईक यांना पाठवण्यात आलं. पण नाईक यांनी गोव्यासाठी कोणतंही भरीव काम केलं नाही. त्यामुळं त्यांना राज्यसभेवर पाठवल्याची आम्हाला खंत वाटते, अशी झणझणीत टीका मंत्री ढवळीकर यांनी यावेळी केली.Read More
vlcsnap-2017-06-29-19h14m22s207
मुरगाव, सालसेतसाठी वेर्णात कचरा प्रकल्प उभारणार वेर्णातील कचरा प्रकल्पावर अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च होणार जनतेचे सहकार्य लाभल्यास २०१९मध्येच कचरामुक्त गोवा होईल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ग्वाही मुरगाव आणि सालसेतला कचरामुक्त करण्यासाठी वेर्णा इथं कचरा प्रकल्प उभारला जाईल. जनतेचे सहकार्य लाभल्यास २०१९ मध्येच संपूर्ण गोवा कचरामुक्त होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मडगावच्या कार्यक्रमात दिली.Read More
power
नगरगाव पंचायतीत विजेचा लपंडाव मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण न केल्याचा परिणाम वीज खात्याचा अजब कारभार; नागरिक हैराण नगरगाव पंचायतीनं मान्सूनपूर्व कामात दिरंगाई केल्यानं त्याच फटका आता ग्रामस्थांना बसताहे. या भागात गेल्या तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून ग्रामस्थ हैराण झालेत. या प्रकारावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी इथल्या नागरिकांनी केलीये.Read More
vlcsnap-2017-06-29-19h05m54s715
मंत्री डिसोझांचे म्हापशाकडे दुर्लक्ष कॉंग्रेस नेते विजय भिके यांची टीका उत्तर गोव्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हापसा शहराची सध्या अत्यंत दुर्दशा झाली असून स्थानिक आमदारांचे याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका म्हापसा कॉंग्रेस गटाध्यक्ष विजय भिके यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी समितीचे सुदिन नाईक, चंदन मांद्रेकर आणि महाबळेश्वर तोरस्कर उपस्थित होते.Read More
vlcsnap-2017-06-29-19h02m55s162
गणपत पार्सेकर कॉलेजच्या नव्या वास्तूचे ४ रोजी उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती मांद्रे इथं ‘गणपत पार्सेकर कॉलेज’साठी नवी वास्तू बांधण्यात आलीये. या वास्तूचं उद्घाटन ४ जुलै रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.Read More
vlcsnap-2017-06-28-18h55m10s181
तिसवाडीसाठी कुंभारजुवेत कचरा प्रक्रिया प्रकल्प वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केले प्रकल्पाचे स्वागत तिसवाडी तालुक्यासाठी नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणाराहे. कुंभारजुवे पंचायतक्षेत्रात हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी विरोध करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी बुधवारी व्यक्त केली. कोणाला शंका असल्यास साळगावचा कचरा प्रक्रिया प्रकल्प जाऊन बघावा, अशी सूचनाही मंत्री मडकईकर यांनी यावेळी केली.Read More
Close