CHAOS IN CHIMBEL POLLING BOOTH; RESIDENTS COMPLAIN LACK OF POLICE FORCE

Posted On June 11, 2017 By In Local, People, Politics, Top Stories


चिंबल येथील मतदानकेंद्रांवर गुंडांचा हैदोस?
भाडोत्री गुंडांकडून हैदोस माजवण्याचा प्रयत्न?
संवेदनशील केंद्र असूनही अपुरा पोलीस बंदोबस्त
चिंबल येथील मतदारांचा आरोप

एका बाजूनं राज्यात शांततेत मतदान सुरू असताना चिंबल इथं मात्र मतदानाला गालबोट लागला. राज्यातील ७० मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आलीयेत. यामध्ये चिंबलचाही समावेश आहे. या ठिकाणी सकाळी भाडोत्री गुंडांना आणून हैदोस माजवल्याचा आरोप मतदारांनी केलाय. सकाळच्या वेळेत आलेल्या भाडोत्री गुंडांनी मतदारांना विशिष्ट उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. याला मतदारांनी सडेतोड उत्तर दिल्यानं वातावरण तंग झालं. इतकं संवेदनशील केंद्र असूनही पोलिसानी अपुरा बंदोबस्त ठेवल्याचं दिसून आलं. या प्रकारावर मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याहेत.

355
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close