CM PARRIKAR INAUGURATES BUS SERVICE FROM PANJIM TO CUJIRA SCHOOL COMPLEX

Posted On June 5, 2017 By In Local, People, Top Stories


नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ
शाळांमध्ये सुरू झाला किलबिलाट
विद्यार्थी-पालकांची लगबग सुरू
पणजी – कुजिरा संकुल कदंब बससेवा सुरू
मुख्यमंत्र्यांनी बससेवेला दाखवला झेंडा

राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सोमवारपासून सुरुवात झाली असून गेल्या दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या वर्गांमध्ये पुन्हा मुलांचा किलबिलाट सुरू झाला. दोन महिने उन्हाळी सुट्टी संपवून शाळकरी मुले सर्व तयारीनीशी सोमवारी शाळेत हजर झाले. दरम्यान, पणजीतील सर्व शाळा गेल्याच वर्षी बांबोळीतील कुजिरा संकुलात स्थलांतरीत करण्यात आल्याहेत. यामुळं पणजी ते कुजिरा संकुलापर्यंत सोमवारपासून विशेष बससेवा सुरू केलीये. या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

दरम्यान, पणजीतील शाळा कुजिरा इथं स्थलांतरीत केल्यानं शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटलीये; मात्र आणखी काही समस्या शहराला भेडसावत आहेत. त्या शोधण्यासाठी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी यावेळी दिली.

375
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close