After CM Parrikar, Now King Cobra Gives Surprise Visit to Valpoi Police Station

Posted On April 20, 2017 By In Special Stories, Top Stories


आता कोब्राचीही ‘सरप्राईज व्हीजिट’
कोब्राला पाहून पोलीस स्थानकात धावपळ
वाळपई पोलीस स्थानकातील प्रकार

वाळपई पोलिस स्थानकात पोलीस निरीक्षकांच्या खोलीत किंग कोब्रानं ‘सरप्राईज व्हीजिट’ दिल्यानं गुरुवारी सकाळी पोलिस कर्मचाऱ्यांचे पळापळ झाली. त्यानंतर स्थानिक सर्पमित्रानं येऊन कोब्राला बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं.

voice over
प्रशासनातील मरगळ दूर होऊन शिस्त लागावी आणि सर्वजण सदैव दक्ष राहावे, यासाठी नव्यानं सत्तेत आलेल्या सरकारातील मंत्र्यांनी शासकीय कार्यालयांना ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्याचा धडाका लावलाय. आता अशा ‘सरप्राईज व्हीजिट’ देण्यामध्ये किंग कोब्रानं देखील उडी घेतलीये. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गेल्याच आठवड्यात पणजीतील पोलीस मुख्यालयाला ‘सरप्राईज व्हीजिट’ दिली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी किंग कोब्रानं वाळपई पोलीस स्थानकाला ‘सरप्राईज व्हीजिट’ दिल्यानं सर्वांची धावपळ झाली. हा कोब्रा इकडं तिकडं न जाता चक्क साहेबांच्याच खोलीत शिरला. त्यामुळं अन्य कर्मचारी गोंधळले. त्यांनी लगेच स्थानिक सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्राने येऊन कोब्राला बाहेर काढलं अन सर्व पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. कोब्राच्या या ‘सरप्राईज व्हीजिट’मुळं पोलिस कर्मचारी भलतेच दक्ष झाल्याचं दिसून आलं.

दरम्यान, गोव्यात उष्णतेचा पारा चढल्यामुळं सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणात दृष्टीस पडू लागलेत. वाळपईमध्ये आतापर्यंत हजारभर किंग कोब्रांना पकडून दूरवर सोडण्यात आल्याची माहिती सर्पमित्राने दिली.

249
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close