CM Parsekar quoting GMC Doctors says- MLA Vishnu’s health condition is stable now

Posted On August 16, 2016 By In Local, Politics, Top Storiesउपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती स्थिर
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची माहिती
उपसभापती विष्णू वाघ यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू
प्रकृती बिघडल्याने ४८ तास डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार
ह्रदयविकारतज्ञ डॉ. बोरकर यांनी दिली माहिती

गोवा विधानसभेचे उपसभापती विष्णू वाघ यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू असून सध्या ४८ तास त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलंय. ही माहिती वाघ यांच्यावर उपचार करणारे ह्रदयविकारतज्ञ डॉक्टर बोरकर यांनी पत्रकारांना दिली. सोमवारी अचानक त्यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना अस्वस्थता वाटू लागली होती. त्यामुळं तातडीनं त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.

दरम्यान, वाघ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.

257
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close