CONGRESS DEMANDS OPINION POLL ON CASINOS

Posted On September 14, 2016 By In Local, People, Politics, Top Storiesभाजपच्या विरोधात काँग्रेसचे आरोपपत्र तयार
पुढील आठवड्यापासून आरोपपत्र घरोघरी पोहोचवणार
प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची पत्रपरिषदेत माहिती
गोव्यात गुजरात, दिल्ली मॉडेलची आवश्यकता नाही
गोव्यात विकासाचे स्वतंत्र मॉडेल उभारण्याची गरज
गोव्याच्या विकासाला खिळ बसण्यात सर्वच सरकारे जबाबदार

महागठबंधवर ३० सप्टेंबरनंतर निर्णय घेणार : फालेरो

भाजपच्या विरोधात काँग्रेसने आरोपपत्र तयार केले असून ते राज्यात घरोघरी पोहोचवण्यात येणाराहे. हा उपक्रम पुढील आठवड्यापासून सुरू केला जाणाराहे. यामध्ये गेल्या साडेचार वर्षांतील सरकारची सुमार कामगिरी आणि ‘यू-टर्न’ जनतेपर्यंत पोहोचवले जाईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेसचे केंद्रीय नेते चेल्लाकुमार, माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन आदी नेते उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत फालेरो यांनी मोदी सरकार आणि केजरीवाल सरकारवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. गुजरात आणि दिल्ली मॉडेल गोव्याचा विकास करू शकणार नाही. गोव्यासाठी स्वत:चं मॉडेल बनवावं लागेल. त्यासाठी कॉंग्रेस पक्ष प्रयत्न करणाराहे, असं दावा फालेरो यांनी यावेळी केला.

210
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close