Dangerous Bacteria on Mobile phones

Posted On February 23, 2017 By In Special Stories


मोबाईलधारकांनो सावध…
मोबाईल संचावर बसलेत यमाचे दूत…
मोबाईलचं व्यसन घेईल तुमचे प्राण…
मोबाईलमुळे बळावू शकतात जीवघेणे आजार…
काय आहे प्रकार पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट

एकीकडे मोबाईल ही काळाची गरज बनली असताना दुसरीकडे हाच मोबाईल अनेकांसाठी ‘काळ’ बनण्याची भीती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या संशोधनातून समोर आलीये. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने २०१५ साली ३८६ लोकांवर एक संशोधन केला होता, ज्यामध्ये कळाले होते की साधारणतः ८२ टक्के लोकांच्या मोबाईल फोनमध्ये हानिकारक किटाणू सापडले होते. हल्लीच एका प्रश्नाच्या उत्तरात स्वास्थ्य राज्यमंत्र्यांनी लोकसभेत तसं उत्तर दिल्यानं हा चर्चेचा विषय ठरलाय. काय आहे हा प्रकार पहा इन गोवाचा खास रिपोर्ट…
मोबाईलधारकांनो सावध…
मोबाईल संचावर बसलेत यमाचे दूत…
मोबाईलचं व्यसन घेईल तुमचे प्राण…
मोबाईलमुळे बळावू शकतात जीवघेणे आजार…
काय आहे प्रकार पहा ‘इन गोवा’चा खास रिपोर्ट

आज आम्ही तुमच्यासमोर एका अशा गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत जी ऐकल्यावर तुम्ही देखील हादरून जाल… ज्या मोबाईलनं सारी दुनिया तुमच्या मुठीत आणून दिलीये… तो मोबाईल तुम्हाला या जगातून कायचे उठवू शकतो… ज्या मोबाईलवर तुम्ही जीवापाड प्रेम करता तो मोबाईलच तुमचा जीव घेऊ शकतो… मोबाईलच्या रेडीएशनमुळे तुम्हाला जीवघेणे आजार होऊ शकता, हे तुम्हाला माहिती आहे, पण मोबाईल संचामुळेदेखील तुम्हाला जीवघेणे आजार होऊ शकतात, असं जर सांगितलं तर खरं वाटेल… नाही ना!… हो पण हे सत्य आहे. हे दुसऱ्या कोणी सांगितलेलं नाही… तर चक्क लोकसभेत राज्य आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिलीये.

२१व्या शतकात सामान्य माणसांच्या जीवनात जर काही बदल घडलेत तर मोबाईल त्यातीलंच एक आहे. परंतु आता २१ व्या शतकात आपला हाच मोबाईल फोन आपल्याला आजारी बनवतोय. आम्ही आपल्याला मोबाईल फोनपासून होणाऱ्या आजारांबद्दल सांगत नाही आहोत. आम्ही आपल्या मोबाईल फोनच्या अस्वचछतेविषयी विश्लेषण करणार आहोत. आपल्याला माहित आहे का की, आपल्या हातात जो स्मार्टफोन आहे तो एका शौचालयापेक्षाही घातक आहे. हा स्मार्टफोन शौचालयापेक्षा २० टक्के अधिक अस्वच्छ आहे. सहसा लोक फ्लशला हात लावण्यास मागे पुढे करतात. कारण ते अतिशय घाण असते. त्याच्यावर खूप बक्टेरिया असतात. परंतु आपण हे ऐकल्यावर अस्वस्थ होणार की शौचालय सीट किंवा फ्लशपेक्षाही जास्त किटाणू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर असतात.

205
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close