DECOMPOSED BODY FOUND IN PANJIM HOTEL

Posted On June 22, 2017 By In Crime, Local, People, Top Stories


केणी हॉटेलमध्ये केरळीयन पर्यटकाची आत्महत्या
मयत पर्यटकाचे नाव सजयन (रा. केरळ)
कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
पोलिसांनी पंचनामा करून तपासकार्य केले सुरू
हॉटेल व्यावसायिकांच्या कारभारावर उभे राहिले प्रश्नचिन्ह

पणजीतील १८ जून मार्गावर असलेल्या केणी हॉटेलमध्ये केरळच्या पर्यटकानं आत्महत्या केल्याचं गुरुवारी उघडकीस आलं. सजयन असं मयत पर्यटकाचं नाव असून १५ रोजी तो एकटाच या हॉटेलमध्ये उतरला होता. २० जूनपर्यंत त्याने हॉटेलची खोली आरक्षित केली होती. १८ जून रोजी रात्रीपर्यंत त्याला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पहिले; मात्र त्यानंतर गुरुवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा वाजवला तरी तो पर्यटक बाहेर आला नाही. त्यामुळं पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी येऊन दरवाजा उघडला असता, तो पर्यटक मृतावस्थेत आढळला. त्याने हाताची नस कापून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासावेळी दिसून आलं. त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या आवस्थेत होता. आता ही खरच आत्महत्या आहे की घातपात, याचा तपास आता पणजी पोलीस करत आहेत.

351
SHARES

Tags : , , ,

1 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close