DEEP SEA FISHING BEGINS, 61 DAYS BAN PERIOD OVER

Posted On August 1, 2016 By In Local, People, Top Stories


दोन महिन्यांनंतर मासेमारी बंदी उठली
मासेमारीसाठी बोटी गेल्या समुद्रात
मत्स्यखवय्यांचीही लगबग झाली सुरू

दोन महिन्यांच्या बंदीनंतर राज्यातील मासेमारी सोमवार, १ ऑगस्टपासून सुरू झाला. अनेक बोटी आणि मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाले असून मत्स्यप्रेमींना आता पाहिजे ते ताजे मासे खायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.

यंदा १ जून ते ३१ जुलै असा एकूण ६० दिवसांचा कालावधी मासेमारी बंदीसाठी आखण्यात आला होता. मत्स्यप्रेमींना तो संपण्याची आणि नवीन ताजे मासे मिळण्याची अपेक्षा होती. तो बंदीचा कालावधी एकदाचा संपुष्टात आला असून मासेमारीसाठी व मासे खरेदीसाठी सोमवारपासून गर्दी झाली होती.

गोव्यातील मासेमारी बोटींवर काम करण्यासाठी कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू येथील कामगार मोठय़ा प्रमाणात असून त्यांचे आगमन सुरु झाले आहे. जाळी तसेच मासेमारीची उपकरणे बोटी हे सर्व तयार ठेवण्यात आले असून नवीन मासेमारी हंगाम आजपासून सुरु होत आहे. गोव्यात मासेमारी बंदी असली तरी मासळीची आवक तशी चालूच होती. इतर राज्यातून मासळी गोव्यातील विविध बाजारात येत होतीच.

अखिल गोवा मासेमारी बोट मालक संघनेने १२० दिवसांची बंदी घालण्याची मागणी यापूर्वी केली होती. मासळीचे एकंदरीत प्रमाण कमी होत चालल्याने उत्पादन वाढीसाठी बंदीचा काळ वाढवण्याची गरज होती. परंतु ती मागणी विचारात न घेता दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने दोन महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

235
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close