DHEMPE COLLAGE STUDENTS GHERAO VC GU

Posted On June 6, 2016 By In Local, People, Top Stories


‘धेंपे’नं विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून
मिरामारच्या धेंपे महाविद्यालयातील प्रकार
विद्यार्थ्यांनी घातला कुलगुरूंना घेराव
उपस्थितीची टक्केवारी कमी भरल्याचा फटका

मिरामार येथील धेंपे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अडवून धरल्यानं सोमवारी विद्यार्थी संतप्त बनले. या विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्केपेक्षा कमी असल्यानं हा निकाल अडवून ठेवल्याचं शाळा व्यवस्थापनानं सांगताचं विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना घेराव घातला.

मिरामार येथील धेंपे महाविद्यालयाच्या बीएस्सी आणि बीएच्या १०८ विद्यार्थ्यांना हजेरी कमी असल्याचं कारण सांगून महाविद्यालयानं ऑक्टोबर २०१५ मध्ये होणार्‍या पहिल्या आणि तिसर्‍या सेमिस्टरला बसू नका, असं सांगितलं होतं. यानंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी कुठलीही मदत करण्यास नकार दिला होता. एप्रिल महिन्यात पुन्हा होणार्‍या परीक्षेस बसण्याची संधी मिळेल, असा विचार करून विद्यार्थ्यांनी हा विषय सोडून दिला होता. त्यानंतर पुन्हा हजेरीचा प्रश्‍न निर्माण झाला. १०८ विद्यार्थ्यांची हजेरी ७५ टक्के होत नसल्यानं महाविद्यालयानं अतिरिक्‍त वर्ग घेऊन विद्यार्थ्यांची हजेरी भरून काढली जाईल, असं आश्‍वासन विद्यार्थ्यांना दिलं. विद्यार्थ्यांनी या वर्गांना हजेरी लावली आणि एप्रिल २०१६ मध्ये परीक्षाही दिली.

आता अचानक महाविद्यालयानं या विद्यार्थ्यांना हजेरी कमी असल्यानं सदर परीक्षा गृहीत धरली जाणार नसल्याचं सांगितल्यानं विद्यार्थ्यांची चांगलीचं पंचाईत झालीये. महाविद्यालयानं याची जबाबदारी आता गोवा विद्यापीठाकडे सोपवलीये. गोवा विद्यापीठानं आता या विद्यार्थ्यांचा निकाल अडवून धरल्यानं सोमवारी विद्यार्थी संतप्त बनले. त्यांनी थेट कुलगुरूंना घेराव घातला. कुलगुरूंनी मात्र याप्रश्नी मौन बाळगलं.

206
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close