‘गृहआधार’च्या नव्या अर्जांना तूर्तास मान्यता नाही
‘गृहआधार’ योजनेचा घेणार फेरआढावा
सद्यस्थितीतीत १.५२ लाख महिलांना दिला जातो ‘गृहआधार’
आढावा घेतल्यानंतरच नव्या अर्जांना देणार मान्यता
महिला बाल कल्याण खात्याच्या संचालकांची माहिती
गत सरकारनं चालू केलेल्या गृहआधार योजनेचा फेरआढावा घेण्यात येणार असल्यानं नव्या अर्जांना तूर्तास मान्यता दिली जात नसल्याचा खुलासा महिला आणि बालकल्याण खात्याच्या संचालकांनी पत्रकारांना दिली. ही योजना चालू करताना दीड लाख महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट तत्कालीन सरकारनं ठेवलं होतं. ही संख्या आता १ लाख ५२ हजारांपर्यंत पोहोचलीये. त्यामुळं योजनेचा फेरआढावा घेतल्यानंतरच नव्या अर्जांवर विचार केला जाईल, असं संचालकांनी यावेळी स्पष्ट केलं.