DRUNK RUSSIAN STABS 4 PEOPLE [WATCH VIDEO]

Posted On June 14, 2016 By In Crime, Local, People, Top Stories


मद्यपी रशियन पर्यटकांची दादागिरी !
रशियन नागरिकाने ३-४ जणांवर केला सुरी हल्ला
कळंगुट-बागा इथे मंगळवारी माजली खळबळ
जखमींमध्ये महिला, लहान मुलाचा समावेश
घटनेनंतर संशयिताचा दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न
टॅक्सीचालकाने पाठलाग करून संशयिताला पकडले
कांदोळी इथे संशयिताला पकडण्यात यश

कळंगुट-बागा इथं मद्यपी रशियन पर्यटकानं तीन ते चार जणांवर सुरीहल्ला चढवल्यानं मंगळवारी खळबळ माजली. जखमींमध्ये एक लहान मुल आणि त्याचा आईचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळालेल्या त्या संशयिताला एका जागरूक टॅक्सी चालकानं पाठलाग करून कांदोळी किनाऱ्यावर पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. या प्रकारामुळं गोव्यात रशियन आणि नायजेरीयन पर्यटकांची दादागिरी शिगेला पोहोचल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

voice over

उत्तर गोव्यातील किनाऱ्यांवर रशियन पर्यटक दादागिरी शिगेला पोहोचली असून त्यांच्यावर सरकारचे अजिबात नियंत्रण नसल्याचं मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील सहा वर्षांपूर्वी एका रशियन नागरिकाकडून स्थानिक टॅक्सी चालकाचा खूनही झाला होता; त्याचवेळी त्यांच्या नांग्य ठेचून काढण्यात अपयश आल्यानं हे पर्यटक आता मुजोर झालेत. आता हे पर्यटक खुलेआम गोमंतकीय नागरिकांवर हल्ले करू लागलेत.

मंगळवारी सकाळी अशाच एका रशियन पर्यटकानं कळंगुट-बागा इथं तीन ते चार जणांवर सुरी हल्ला केला. यामध्ये एका महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा समावेश होता. या पर्यटकानं अतिमद्यप्राशन केलं होतं. सुरी हल्ला केल्यानंतर त्यानं दुचाकीवरून पसार झाला. दरम्यान, त्याचवेळी एका स्थानिक खाजगी टॅक्सी चालकानं त्याचा पाठलाग केला आणि कांदोळी किनारी त्याला पकडले. त्यानंतर त्याला कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली असता त्याला अजिबात शुद्ध नसल्याचं दिसून झालं. त्यामुळं हा हल्ला त्यानं कशासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मागच्या सहा वर्षांपूर्वी विठ्ठलदासवाडा मोरजी इथं एका टॅक्सी चालकाला जबर मारहाण करून एका रशियन नागरिकानं स्थानिक युवकाचा खून केला होता. हा रशियन नागरिक आश्‍वे इथं रेस्टॉरंट चालवत होता.

गेल्या वर्षी बार्देश तालुक्यातील एका टॅक्सी चालकाने दोन रशियन महिलांचे भाडे आश्‍वे येथे आणले होते. त्यावेळी ठरवून दिलेल्या पैशाची मागणी टॅक्सी चालकानं केली असता, त्या टॅक्सी चालकाला कमी पैसे दिले आणि टॅक्सी चालकाशी हुज्जत घालून त्याला मारहाण केली. अशा कित्येक कारणांमुळे रशियन पर्यटकांची किनारी भागात दादागिरी चालू असल्याचं आता पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.किनारी भागात अधून मधून होणार्‍या पार्ट्यांतही ड्रग्स विक्रीत नायजेरीयन आणि रशियन यांचा मोठा वाटा असतो. सरकारनं अशा दादागिरी आणि बेकायदा व्यवसाय करणार्‍या विदेशी नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांतून होताहे.

227
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close