ELVIS GOMES JOINS AAP

Posted On October 5, 2016 By In Local, Politics, Top Stories



एल्विस गोम्स यांचा ‘आप’मध्ये प्रवेश
मनीष सिसोदिया यांनी केले गोम्स यांचे स्वागत
एल्विस गोम्स यांनी भाजप सरकारवर टीका

नागरी सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेले माजी अधिकारी एल्विस गोम्स यांनी अखेर ठरल्याप्रमाणे बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांना पक्षात रीतसर प्रवेश दिला.

‘आप’मध्ये प्रवेश केल्यानंतर गोम्स यांनी भाजप सरकारवर टीका केली. “भाजपनं साडेचार वर्षाच्या काळात कोणताही विकास केला नाही. आता निवडणुका जवळ येताचं विकासकामांना चालना दिल्याचं गोम्स यावेळी म्हणाले.

दरम्यान, भाजपने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधीच विकास केला नाही. केवळ गोव्याचं हित लक्षात घेऊन विकास केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिलीये.

191
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close