FARMER’S STRIKE IN MAHARASHTRA; THROW VEGGIES AND POUR MILK ON HIGHWAY

Posted On June 1, 2017 By In National News, People, Top Stories


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले तीव्र
बाजारात दूध व भाजीपाला आणू नये : संपकऱ्यांचे आवाहन
महाराष्ट्रातून गोव्याला होणाऱ्या दुध, भाजीपाल्यावर होणार परिणाम

दुष्काळ, नापिकी, अस्मानी संकट, शेती मालाला भाव, कर्जबाजारी आणि उदासीन सरकारी धोरण यांच्या कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून संप पुकारला. या संपाचा फटका सुरुवातीच्या ४ ते ५ तासात दिसून आला असून, राज्यभर शेतकरी दूध, फळे, पालीभाज्या रस्त्यावर फेकून देत आहेत. काही ठिकाणी तर आंदोलनकर्त्यांनी मर्यादा ओलांडून लाखो लीटर दूध आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून त्याची प्रचंड नासाडी केली. या प्रकारामुळं मुंबई, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या दुधाच्या आणि भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. हे आंदोलन असेच चालू राहिल्यास गोव्यातील दूध आणि भाजीपाल्यात काहीसा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साताऱ्यात शेतकरी संपाची पहिली ठिणगी पडली असून, वारणा दूध डेअरीचे दोन ट्रक शेतकरी आंदोलकांनी फोडले आहेत. एक थेंब दूध आणि भाजीपाल्याची विक्री होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला.

246
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close