GCA CLUB MEMBERS DENIES ALLEGED 5.87 CR SCAM

Posted On June 23, 2016 By In Local, People, Sports, Top Stories


जीसीएला दिलेल्या निधीची माहिती द्या
बीसीसीआयला जीसीएचे पत्र

गोवा क्रिकेट संघटनेला देण्यात आलेल्या निधीची सविस्तर माहिती देण्याची मागणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे करण्यात आलीये. तसं पत्र पोलीस मुख्यालयातून बीसीसीआयला पाठवण्यात आलंय.

voice over
जीसीएच्या पदाधिकार्‍यांच्या कोटींच्या अफरातफरीच्या प्रकरणात पोलिसांनी बीसीसीआयला पत्र लिहिलंय. त्यात एकंदरित प्रकरणाची माहिती देतानाच बीसीसीआयने आतापर्यंत किती वेळा आणि किती निधी जीसीएला दिला त्याची सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. तसेच बीसीसीआयच्या पैशांचा गैरवापर झाल्याचे आढळून आल्यामुळे या प्रकरणातील चौकशीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यालयातील सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली.

डीसीबी बँकेच्या कॅशिअरची पोलिसांनी रविवारी जबानी नोंदविली होती. अटक करण्यात आलेले संशयित चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांनीच जीसीएचे अनाधिकृत खाते खोलण्यात आल्याची पुष्टी देणारी माहिती त्याने जबानीत नोंदविली आहे. त्यामुळे अगोदर अडचणीत आलेल्या या मंडळीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
दरम्यान, संशयितांच्या जामीन अर्जावर पणजी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. संशयिताच्या वतीने सुरेंद्र देसाई यांनी युक्तिवाद केले. पोलिसांनी संशयितांना केलेली अटक ही कायदेबाह्य असल्याचे तसेच त्यांच्यावर ठेवण्यात आलेले हे गुन्हेही कायद्याला अनुसरून नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. गुरुवारी सुनावणी पुढे चालू राहील.

215
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close