GOA BUDGET 2017: VAT ON PETROL TO BE RAISED TO 15%

Posted On March 24, 2017 By In Local, People, Politics, Top Stories

ETROL TO BE COSTLIER; VAT TO BE 15% ON PETROL

सरकारनं सामान्यांना हळूच काढला चिमटा
कार स्वस्त पण पेट्रोल महागले
पेट्रोलवर १५ टक्के लागू केला मूल्यवर्धित कर
पेट्रोलचे दर ६५ रुपयांवर स्थिरावणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आश्वासन

या अर्थसंकल्पात सरकारनं सामान्य जनतेला हळूच चिमटा काढत पेट्रोलवर १५ टक्के मूल्यवर्धित कर लागू केला. त्यामुळं आतापर्यंत ६० रुपयांवर स्थिरावलेले पेट्रोलचे दर पासष्टीत पोहोचणाराहेत. मात्र पासष्टच्या वर पेट्रोचे दर जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिलीये.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात वाढ करण्यात आली. ९ मार्च २०१२ रोजी राज्यात भाजपचे सरकार बहुमतानं सत्तेत आलं होतं. त्यावेळी देशभरात पेट्रोलचे दर ७० रुपयांच्या वर गेले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन पर्रीकर सरकारनं ११ टक्के मूल्यवर्धित कर रद्द केल्यानं देशभर कौतुक झालं होतं. सरकारच्या या निर्णयामुळं महागाईनं होरपळणाऱ्या गोवेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता; मात्र त्यानंतर अडीच वर्षांनी खाण व्यवसाय बंद पडल्यानं सरकार आर्थिक संकटात आलं. त्यामुळं पार्सेकर मंत्रीमंडळानं पुन्हा मूल्यवर्धित कर लावून पेट्रोलच्या किमती ६० रुपयांच्या वर जाणार नाहीत, याची हमी दिली होती. त्यामुळं पेट्रोलचे दर पाच वर्षे स्थिरावले होते. खाण व्यवसाय अजून पूर्वपदावर आलेला नाही. त्यामुळं नव्या सरकारला पेट्रोलवरील कर वाढवण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. अखेर पर्रीकर यांनी पेट्रोलचे दर वाढवून जनतेला हळूच चिमटा काढला.

333
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close