GOA CM & DY.CM REACTS ON ELVIS GOMES EXIT [GOA HOUSING SCAM]

Posted On July 1, 2016 By In Local, People, Politics, Top Stories


 

सेवेत पुरेशी वर्षे झाल्याने स्वेच्छा निवृत्ती अर्ज
तुरुंग महानिरीक्षक एल्विस गोम्स यांचा खुलासा

गृहनिर्माण घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्यानं गुन्हा नोंदवल्यानं प्रचंड नाराज झालेले तुरुंग महानिरीक्षक आणि पालिका प्रशासनाचे संचालक एल्विस गोम्स यांनी स्वेच्छा निवृत्ती अर्ज सादर केल्यानं प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये; मात्र सेवेत २५ वर्ष पूर्ण झाल्यानं हा अर्ज केल्याचा खुलास गोम्स यांनी केलाय.
…….
गुन्ह्याची माहिती घेऊन राजीमाना स्वीकारणार
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची प्रतिक्रिया

दरम्यान, गोम्स यांनी दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळं उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा बरेच नाराज झालेत. त्यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊन त्यांच्या राजीनाम्यावर विचार केला जाईल, अशी माहिती मंत्री डिसोझा यांनी दिलीये.
…….

जोपर्यंत तक्रारीचा छडा लागत नाही, तोपर्यंत गोम्स यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केलीये.

235
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close