Goa Dalit Activist insulted by a politician

Posted On July 23, 2016 By In Crime, Local, People, Politics, Top Stories


गोव्यातही दलितांवर अत्याचार

आसगाव पंचसदस्य कांबळींना केले अपमानित
राघोबा कांबळी यांची पोलिसांत तक्रार दाखल

देशभरात विविध ठिकाणी दलितांवर अत्याचाराच्या घटना घडत असताना आता गोवाही यात मागे राहिलेला नाही. इथंही खुद्द मंत्र्यांच्या समक्ष दलित नेत्यावर अत्याचाराची घटना घडलीये. आसगाव पंचायत सभागृहात सरकारच्या ज्योतिर्मय योजनेंतर्गत बल्ब वितरणाच्या कार्यक्रमात पंचायतीचे नियुक्त सदस्य राघोबा कांबळी यांना अपमानित करण्यात आल्याची तक्रार हणजूणच्या पोलीस ठाण्यात दाखल झालीये.

voice over
गेल्या आठवड्यात १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आसगाव पंचायत सभागृहात एलईडी बल्बचे वितरण सुरू होतं. यावेळी मंचावर जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर उपस्थित होते. या ठिकाणी मंचावर मदत करण्याच्या हेतूनं राघोबा कांबळी पुढे सरसावले होते. यावेळी मंचावरील एकानं त्यांना अपमानित करून तेथून हाकलून लावलं, अशी तक्रार त्यांनी पोलीस स्थानकात दाखल झालीये. याबाबतीत पंचायतीच्या इतर सदस्यांनी आक्षेप घेतला असून पुढील कृती ठरवण्यासाठी बुधवारी उशिरा पंचायतीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सरपंच प्रियंका सांगेलकर यांना धारेवर धरले आणि घडलेल्या प्रकाराबद्दल आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी कांबळी यांनी केली.

तक्रारदार राघोबा कांबळी यांनी तक्रारीच्या प्रती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आणि सामाजिक संस्थेकडे सादर केल्या आहेत. दरम्यान, या तक्रारीसंदर्भात हणजूण पोलीस स्थानिकांशी संपर्क साधला असता काहीच दुजोरा मिळू शकला नाही.

225
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close