Goa Police Breaking Traffic Rules

Posted On April 19, 2017 By In Top Stories


मुख्यमंत्र्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचा दिल्याहेत सूचना
गोव्याचे पोलिसच मोडताहेत वाहतुकीचे नियम
लोकां सांगे वाहतूक नियम, स्वत: मात्र सोडी संयम
मांडवी पुलावर नियम तोडून पोलीस वाहनाने केले ओव्हरटेक
जनतेला शिस्त लावणाऱ्या पोलिसां ना कोण शिस्त लावणार
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाहन चालकांचा सवाल

राज्यात सुरू असलेल्या रस्ता अपघातांच्या मालिका रोखण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक पोलिसांना कानपिचक्या देऊन केवळ २४ तास उलटले नाही, तोच पोलिसांची वाहनेचं वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने चालवत असल्याचं इन गोवाच्या कॅमेरात कैद झालंय. त्यामुळं अशा पोलिसांना कशी शिस्त लावणार असा संतप्त सवाल वाहन चालकांमधून विचारला जाताहे….

voice over
रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहतूक खात्याला दिल्याहेत; मात्र जनतेला शिस्त लावणारे वाहतूक खात्याचे अधिकारी आणि कर्मचारीच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेदरकारपणे वाहने चालवत असल्याचं स्पष्ट झालंय. बुधवारी वाहतूक खात्याचं असंच एक वाहन मांडवी पुलावर नियम मोडून ओव्हरटेक करताना ‘इन गोवा’च्या कॅमेरात कैद झालंय. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता… GA07-Q-1189 या क्रमांकाची पोलीस गाडी मांडवी पुलावरून जाताहे. पुढे पणजीच्या बाजूला पोहोचता पोहोचता या गाडीनं समोरच्या टेंपोला ओव्हरटेक केलं. पुन्हा एकदा बघा… या पुलावर केवळ ताशी चाळीस किलोमीटर वेगाने वाहने चालवण्याचे बंधन आहे. त्याचबरोबर पूल अरुंद असल्यानं ओव्हरटेक करण्यासही बंदी आहे. त्यासाठी पिवळा पट्टा ओढलेला आहे; मात्र तरीदेखील पोलिसांच्या या वाहनानं नियम पायदळी तुडवून ओव्हरटेक केलं. अशा पोलिसांना अगोदर शिस्त लावण्याची आवश्यकता आहे. आता मनोहर पर्रीकर पोलिसांना कसे धडे देणार? असा प्रश्न वाहनचालकांमधून विचारला जाताहे.

231
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close