GOA RELIGIOUS CROSS DESECRATION ROW : POLICE TO INTENSIFY PATROLLING

Posted On July 4, 2017 By In Local, People, Top Stories


मडगावात एकाच रात्री मंदिर आणि क्रॉसवर हल्ले
धार्मिक तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न
कालकोंडातील श्रीकृष्ण मंदिराचे तुळसीवृदांवर फोडले
पावर हाऊसमध्ये क्रॉसची केली तोडफोड

मडगाव भागात काही समाजकंटक मंदिर आणि क्रॉसची तोडफोड करून हिंदू आणि ख्रिस्ती यांच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न करत असल्याचं मंगळवारी समोर आलं. या ठिकाणी एकाच रात्रीत हिंदू आणि ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांची तोडफोड केल्यानं या भागातील नागरिक संतप्त बनलेत. पहिल्या घटने मडगावातील आखे पावर हाऊसमधील पोर्तुगीजकालीन क्रॉसची तोडफोड केल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे कालकोंडा भागातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील तुळशीवृद्धांवन आणि देवळातील नंदीची मूर्ती फोडल्याचं समोर आलं. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून पोलिसांनी समाजकंटकांना त्वरित पकडून कडक कारवाई करावी, अशी मागणी
या नागरिकांनी केलीये.

240
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close