GOA SURAJ PARTY CONVENTION ON 3RD JULY

Posted On June 25, 2016 By In Local, Politics, Top Stories


गोवा सुराज पक्षाच्या जाहिरनाम्याचं प्रकाशन
कॅसिनो, भाषा माध्यमासारखे प्रश्न सोडवण्याचे वचन
गोवा सुराज पक्षाचे पणजीत ३ रोजी अधिवेशन
शापोरातील प्रकल्पाला दर्शवला तीव्र विरोध
‘शिक्षण संस्था राजकारणमुक्त करावी’
गोव्यातील खाणी सहकार तत्वावर चालवा
गोवा सुराज पक्षाची पत्रपरिषदेत मागणी

गोवा सुराज पक्षातर्फे रविवार, ३ जुलै रोजी पणजीतील मिनेझिस ब्रगांझा सभागृहात एका अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत पक्षानं आपला निवडणूक वचननामही जाहीर केला. यामध्ये कॅसिनो, माध्यम प्रश्न, दुहेरी नागरिकत्व, शापोरा प्रकल्प, खाण आदी वादग्रस्त विषय सोडवण्याचं आश्वासनं दिलंय.

voice over
गोवा सुराज पक्षातर्फे रविवार, ३ जुलै रोजी पणजी होणाराहे. या अधिवेशनात मांडवीतील कॅसिनो खोल समुद्रात न्यावेत, असा पहिला ठराव घेतला जाईल. अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

शिवोलीतील तार खाजन कुळ संघटनेनं शापोरातील प्रकल्पाला विरोध दर्शवला. या संघटनेला पक्षानं पाठिंबा द्यायचं ठरवलंय.

शिक्षणाचं माध्यम मुलांना समजणाऱ्या भाषेतून व्हायला हवं. सध्या भाषा माध्यमावरून जो वाद चालू आहे, तो निव्वळ राजकारणाचा भाग आहे. या प्रकाराला पक्षांचा विरोध राहील, अशी माहिती यावेळी पक्षाच्या नेत्यांनी दिली.

सध्या राज्यात स्वातंत्र्यसैनिकांचा सुळसळाट झालाय. मुळात स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्षचं बनावट स्वातंत्र्यसैनिक आहेत. यासाठी खऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची यादी बनवण्यासाठी पक्ष कार्य करेल.

गोवा विद्यापीठासहा अन्य सर्व शैक्षणिक संस्थांना राजकारणापासून मुक्त करावं, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

गोव्यातील खाणी एखाद्या उद्योजकाला भाडेपट्टीवर देण्याऐवजी सहकार तत्वावर चालवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

208
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close