GOVERNMENT QUARTERS IN GOA UNSAFE? BALCONY OF GMC QUARTER COLLAPSES

Posted On June 12, 2017 By In Local, People, Top Stories


गोमेकॉच्या निवासी इमारतीची बाल्कनी कोसळली
जुनी इमारत मोडकळीस आली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष

राज्यात मान्सून सक्रीय झाला असून संततधार पडणाऱ्या पावसामुळं अनेक ठिकाणी पडझडी होण्याच्या घटनांची मालिका सुरू झालीये. अशाच दोन घटना सोमवारी बांबोळी आणि ताळगाव परिसरात घडल्या. बांबोळी इथं गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी संकुलातील एका इमारतीची बाल्कनी कोसळल्यानं खळबळ माजली. या इमारतीत दोन परिचारिका राहतात. घटना घडली त्यावेळी या परिचारिका कामावर होत्या. त्यामुळं सुदैवानं त्या बचावला. दरम्यान, गोमेकॉच्या निवासी इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांची पुनर्बांधणी करणं गरजेचं बनलंय. तशी मागणी केली असता बांधकाम खाते आणि गोमेकॉचे डीन एकमेकांकडे बोटे दाखवून गप्प बसत असल्याचा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय.

298
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close