IS THIS WHAT GTDC CALLS SAFE LANDING OF THE HOT AIR BALLOON?

Posted On March 21, 2017 By In Local, People, Top Stories


‘हॉट एअरबलून’वर जीटीडीसीची सारवासारव
‘हॉट एअरबलून’ कोसळले नसल्याचा केला खुलासा
‘एअरबलून’ सफरीच्या सुरक्षिततेवर विचार नाहीच
प्रतिष्ठा जपण्यासाठी जीटीडीसीकडून केविलवाणा प्रयत्न

पंचवाडी शिरोडा इथं एका घराशेजारील मोकळ्या शेतात ‘हॉट एअरबलून’ कोसळल्याचं वृत्त प्रसिद्ध होताचं गोवा पर्यटन विकास महामंडळानं या समस्येच्या खोलात जाण्याऐवजी या प्रकारावर सारवासार करण्याचा प्रयत्न केलाय. ही निव्वळ अफवा असल्याचा बनाव महामंडळानं केला असून या सारवासारवीमुळं महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. महामंडळाला खरचं पर्यटक आणि जनतेची काळजी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाताहे.

गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे काही साहसी उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यातील एक प्रकार म्हणजे ‘हॉट एअरबलून’… गॅस फ्लेमच्या साहाय्यानं या बलूनमध्ये उष्ण हवेचा दाब निर्माण केला जातो. त्यानंतर तो आकाशात उंच भरारी घेतो. यात बसून गोव्याच्या समुद्र आणि निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला जातो; मात्र या ‘हॉट एअर बलून’ला सोमवारी सकाळी अपघात झाला. वाऱ्याची दिशा बदलल्यानं हा बलून गावाजवळ उतरवावा लागला, असा खुलासा महामंडळानं केलाय.

हा एअर हॉट बलून पंचवाडी शिरोडा गावात एका घराशेजारीच मोकळ्या जागेत उतरवण्यात आला. वास्तवात बलूनमध्ये अचानक समस्या उद्भवली त्यानंतर हा बलून वेगानं खाली आला. बलूनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याचं पायलटच्या लक्षात येताचं पायलटनं वेळ न दवडता हा बलून कोणाच्या घरावर कोसळणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली आणि फ्रॅन्की डिकॉस्टा यांचं घराजवळ मोकळ्या जागेत त्याचं ‘लँडींग’ केलं. एक फुगा गावाच्या दिशेनं येत असल्याचं बघून गावातही गोंधळ उडाला. त्यानंतर गावकरी जमा होतं आहेत, असं दिसताचं कर्मचाऱ्यांनी लगबग करून बलून गुंडाळला आणि तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काही छायाचित्रे पाठवून सर्व काही ठीकठाक असल्याची सारवासारव केली. कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीनं इमेल जारी करूनं, तसे काही झालंच नसल्याचा बनाव केला. आता महामंडळानं पाठवलेली छायाचित्रे पहा. यात कुठेही बलून दिसत नाही; मात्र स्थानिकांनी काढलेली ही छायाचित्रे पहा. यात बलून जमिनीवर पडल्याचं स्पष्ट दिसूनं येतंय. ही छायाचित्रे पहा… यात बलून कुठे आहे ते बघा… त्यामुळं खुलासा करूनं सत्य मिटणार आहे का? हा विचार महामंडळाकडूनं झालेला दिसत नाही.

274
SHARES

Tags : , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close