GYMNASIUM OF TILAK MAIDAN COMPLEX FLOODED WITH WATER DUE TO EXCESSIVE RAIN

Posted On June 22, 2016 By In Local, People, Top Stories


व्यायामशाळेचा झाला जलतरण तलाव
वास्कोतील टिळक मैदानावरील प्रकार
व्यायामशाळेच्या छप्परमधून झिरपते पाणी
व्यायामशाळेत व्यायाम कसा करायचा?
स्थानिक युवकांनी व्यक्त केला संताप

वास्कोच्या टिळक मैदानावरील व्यायामशाळेत पाणी भरल्यानं या व्यायामशाळेला स्वीमिंग पूलाचं स्वरूप आलंय. या प्रकारावर स्थानिक युवकांनी संताप व्यक्त केलाय. या भागात टिळक मैदानावरील एकमेव व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्यानं तिची दुरवस्था झालीये. या व्यायामशाळेचं छप्पर पूर्णपणे गळू लागल्यानं पावसाचं पाणी आतमध्ये झिरपू लागलंय. परिणामी व्यायामशाळा पाण्यानं भरलीये. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे इथले तरून व्यायाम करण्यासाठी या ठिकाणी पोहोचले असता हा प्रकार समोर आला. आता या व्यायामशाळेत व्यायाम कसा करायचा? असा प्रश्न या युवकांनी विचारलाय.

256
SHARES

Tags : ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close