HEAVY TRAFFIC JAM AT PONDA USGAO HIGHWAY AS CARGO TRUCK DASHES AT ELECTRICITY POLE

Posted On February 13, 2017 By In Local, People, Top Stories


अपघातामुळे फोंडा – उसगाव तिस्क मार्ग दीर्घकाळ ठप्प
मालवाहू ट्रकने वीजखांबाला धडक दिल्यानं वाहतूक खोळंबली
११ केव्ही जिवंत वीजवाहिनी तुटून महामार्गावर पडली
अपघातानंतर ट्रक तिथेच सोडून चालकाने केले पलायन
वीजखात्यानं विजेचा प्रवाह केला खंडीत; वाहतूक पोलीस पोहोचले घटनास्थळी

एका मालवाहू ट्रकनं वीजखांबाला धडक दिल्यानं सोमवारी सकाळी फोंडा – उसगाव तिस्क महामार्ग अर्धा तास ठप्प झाला. MH-05T-9070 या क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंडा – उसगाव तिस्क महामार्गावतील उतरणीवर पार्क करून ठेवण्यात आला होता. सकाळी चालकानं ट्रक चालू केला आणि त्याचवेळी त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. परिणामी हा ट्रक महामार्गालगतच्या वीजखांबावर जाऊन आदळला. ट्रकची धडक बसताचं वीजखांबावरील उच्च दाबाची वीजवाहिनी तुटून रस्त्यावर पडली. या वाहिनीतून ११केव्हीचा वीजप्रवाह चालू होता. त्यामुळं दोन्ही बाजूनी वाहतूक रोखण्यात आली. घटनेची माहिती मिळताचं वाहतूक पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी वीजखात्याला कळवून विजेचा प्रवाह बंद केला. त्यानंतर वीजवाहिन्या हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. अपघातानंतर चालकानं ट्रक तिथंच सोडून पलायन केलं.

दरम्यान, रात्रीच्या वेळी मालवाहू ट्रक रस्त्यांच्या बाजूला पार्क करून ठेवले जात असल्यानं वळणे आणि उतरणीवर इतर वाहनचालकांना त्रास होत असल्यानं असे पार्किंग बंद करावे, अशी मागणी स्थानिकांनी केलीये.

252
SHARES

Tags : , , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close