HOUSE WALL COLLAPSES DUE TO HEAVY RAINS IN TARIWADA

Posted On July 15, 2017 By In Local, People, Top Stories


राज्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पडझडी
तारीवाड्यावर घराची भिंत कोसळून लाखाची हानी
मंत्री गोविंद गावडे यांनी केली घराची पाहणी

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं शहरी भागातील जनजीवन थंडावलं असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पडझडीच्या दुर्घटना सुरू आहेत. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रियोळ मतदारसंघातील तारीवाडा भागात विश्वंभर फडते यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे १ लाख रुपयांचं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळताचं कलामंत्री गोविंद गावडे यांनी फडते यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.

221
SHARES

Tags : , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close