Humorous comment by Ravi Naik on Union Minister’s Lunch at Schedule Tribes House

Posted On June 6, 2017 By In Local, Politics, Top Stories


एसटी बांधवाच्या घरी जेवण म्हणजे निव्वळ दिखावा
कॉंग्रेस नेत्यांची भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांवर टीका

भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अनुसूचित जमातीच्या बांधवाच्या घरी जेवण करणे, हा निव्वळ राजकीय शो असल्याची टीका विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि कॉंग्रेस आमदार रवी नाईक यांनी केलीये. केंद्रीय मंत्री सुभाष भांब्रे यांच्यासह अन्य भाजप मंत्री आणि खासदारांनी ताळगावात एसटी बांधवाच्या घरी दुपारचे भोजन केले होते. यावर नाईक यांनी खरमरीत टीका केली.
‘कोणी काय खावे, हा प्रत्येकाचा अधिकार’
खाण्यावर कोणतेही निर्बंध असता कामा नये
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची प्रतिक्रिया

गोमांस खाण्याला काहीजण आक्षेप घेत असून याला काँग्रेसनं तीव्र विरोध करण्याचा निर्धार केलाय. कोणी काय खावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी व्यक्त केलीये. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी कॉंग्रेस विधीमंडळ गटाची बैठक होणार होती; मात्र सर्व सदस्य उपस्थित राहू न शकल्यानं ही बैठक पुढे ढकलल्याची माहिती कवळेकर यांनी यावेळी दिली.

301
SHARES

Tags : , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close